स्टेट बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी! 8500 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

स्टेट बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी! 8500 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

बेरोजगार किंवा नव्यानं नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये नोकरीची एक चांगली संधी त्यांना उपलब्ध होत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 07 डिसेंबर : बेरोजगार किंवा नव्यानं नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये नोकरीची एक चांगली संधी त्यांना उपलब्ध होत आहे. एसबीआयने 8500 पदांवर प्रशिक्षणार्थी उमेदवारांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून 20 नोव्हेंबर 2020 पासून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत 10 डिसेंबरपर्यंत आहे. ज्या पात्र उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेले नाहीत, त्यांनी वेळ न घालवता तातडीने अर्ज दाखल करावेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. लॉकडाउनमुळे तर अडचणींमध्ये मोठ्या प्रमाणात भर पडली आहे. तसेच यामुळे बेरोजगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक सुशिक्षित बेरोजगार चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. अनलॉकनंतर उद्योग आणि अर्थव्यवस्थेची घडी संथ गतीने का होईना पण रुळावर येत आहे. ही स्थिती बेरोजगार युवकांसाठी आशादायी अशीच म्हणता येईल.

हे वाचा-नऊ जुळ्या भावंडांच्या जोड्या एकाच वेळी घेणार मेडिकल कॉलजेमध्ये प्रवेश

देशातील बॅंकिंग क्षेत्रात स्टेट बॅंक ही एक अग्रगण्य बँक आहे. या बॅंकेचा विस्तार देशातील खेडोपाड्यांपर्यंत पोहोचलेला आहे. केंद्राच्या अनुदानाशी निगडीत अनेक महत्वपूर्ण योजनांची अंमलबजावणी या बॅंकेमार्फत केली जाते. या बॅंकेने आता सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार संधी उपलब्ध करुन दिली आहे. ही बॅंक 8500 पदांवर प्रशिक्षणार्थी उमेदवारांची भरती करणार आहे. बेरोजगार युवकांसाठी रोजगाराची ही एक उत्तम संधी आहे.

या पदांसाठी इच्छुक उमेदवार बॅंकेच्या अधिकृत sbi.co.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून अर्ज दाखल करु शकतात. या पदभरतीसाठी जानेवारी 2021 मध्ये परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे.

हे वाचा-मोलमजुरी करणाऱ्याच्या मुलाचा IIT पासून अमेरिकेपर्यंत डंका

असे आहेत निकष

या पदभरतीसाठी उमेदवाराने 31 ऑक्टोबर 2020 पूर्वी कोणत्याही विद्यापीठातून कोणत्याही विषयाची पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. तसेच 31 ऑक्टोबर 2020 रोजी उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्षांपर्यंतच असावे. यासाठी उमेदवाराचा जन्म 01.11.1992 च्या पूर्वी आणि 31.10.2000 नंतर झालेला नसावा असे बँकेने स्पष्ट केले आहे. जे उमेदवार ही पात्रता पूर्ण करतात त्यांनी तातडीने अर्ज करावा म्हणजे त्यांना मोठी संधी उपलब्ध होईल. बँकिंग क्षेत्रात उत्तम करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींनी या संधीचं सोनं करायला हवं.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 7, 2020, 5:04 PM IST
Tags: careerSBI

ताज्या बातम्या