सरकारी नोकरी: NMDC लिमिटेडमध्ये 89 पदांसाठी भरती, आज शेवटची तारीख, जाणून घ्या सविस्तर

सरकारी नोकरीची (government job) तयारी करण्याऱ्या उमेदवारांसाठी एक खूशखबर आहे.

सरकारी नोकरीची (government job) तयारी करण्याऱ्या उमेदवारांसाठी एक खूशखबर आहे.

  • Share this:
    22 June: सरकारी नोकरीची (Government job) तयारी करण्याऱ्या उमेदवारांसाठी एक खूशखबर आहे. केंद्रीय पोलाद मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या NMDC लिमिटेड (National Mineral Development Corporation limited) या कंपनीत कोलियरी इंजीनियर, मायनिंग इंजीनियरसह 89 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया उद्या संपणार आहे. त्यामुळे ज्या पात्र उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेले नाहीत ते उद्या म्हणजेच 22 जूनपर्यंत अर्ज करू शकतात. इच्छूक उमेदवार कंपनीच्या nmdc.co.in या ऑफिशियल वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज (online application on official website) करू शकतात. तुम्हीदेखील तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार या पदांसाठी अर्ज करू शकता. याबाबत दैनिक भास्करने वृत्त दिलंय. चला तर जाणून घेऊया एकूण पदं, पात्रता, वयोमर्यादा, सिलेक्शन प्रोसेस, पगार आणि इतर महत्वाच्या बाबी - NMDCमध्ये एकूण 89 जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये कोलियरी इंजिनिअर (22), संपर्क अधिकारी (02), मायनिंग इंजिनिअर (12), सर्वेक्षक (02), इलेक्ट्रिकल ओव्हरमॅन (04), माइन ओव्हरमॅन (25), मॅकेनिकल ओव्हरमॅन (04), माइन सरदार ( 38) या पदांसाठी जागा भरण्यात येणार आहेत. पदांसाठी पात्रता या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांजवळ मॅकेनिकल, मायनिंग मशीनरीमध्ये इंजिनिअरिंगची डिग्री असणं आवश्यक आहे. याशिवाय 10पास उमेदवारही या पदांसाठी अर्ज करू शकतात. पदानुसार पात्रतेच्या माहितीसाठी कंपनीने जारी केलेले नोटीफिकेशन वाचा. हे ही वाचा-आता करिअरमध्ये बिनधास्त जपा कलेची आवड; जाणून घ्या काय आहे Product Designing वयोमर्यादा - या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 65 वर्षांपेक्षा कमी असायला पाहिजे. सिलेक्शन प्रोसेस अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, स्किल टेस्ट आणि मुलाखतीच्या आधारे होईल. वेतन - निवड झालेल्या उमेदवाराला दर महिन्याला 40 हजार ते 90 हजार रुपयांपर्यंत वेतन दिले जाईल. अर्ज कसा करणार - इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी  NMDC लिमिटेडच्या  www.nmdc.co.in या ऑफिशियल वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी कंपनीने जारी केलेले नोटीफिकेशन तुम्ही वेबसाइटवर वाचू शकता. तुम्हीदेखील सरकारी नोकरीची तयारी करत असाल किंवा सरकारी नोकरीचे अर्ज निघण्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. केंद्रीय पोलाद मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या एनएमडीसी लिमिटेड या कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही सविस्तर माहिती घ्या. त्यानंतर ज्या पदासाठी तुम्ही पात्र असाल त्या पदासाठी ऑनलाइन अर्ज तुम्ही करू शकता. सरकारी नोकरी मिळवण्याची ही एक सुवर्ण संधी आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published: