केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रलयांतर्गत (Information & Broadcast Ministry) असलेल्या ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड (BECIL) या संस्थेने विविध पदांवर भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. OT टेक्निशियन, ICU टेक्निशियन, सीनीअर पीएचपी डेव्हलपर, प्रोजेक्ट लीडर, सीनिअर मोबाइल अॅप्लिकेशन डेव्हलपर आदी तांत्रिक पार्श्वभूमीच्या पदांवर ही भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांकडून संस्थेने अर्ज मागवले असून, ऑनलाइन माध्यमातून हे अर्ज करता येणार आहेत.
Senior PHP Developer cum Project Leader, तसंच Senior Mobile Application Developer या पदांकरिता अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2021 ही आहे. तसंच, OT Technician या पदाकरिता अर्ज करण्याची अंतिम मुदत 6 ऑगस्ट 2021 ही आहे.
OT टेक्निशियनची दोन पदं भरली जाणार असून, आयसीयू टेक्निशियनची चार, सीनिअर पीएचपी डेव्हलपर कम प्रोजेक्ट लीडरचं एक आणि सीनिअर मोबाइल अॅप्लिकेशन डेव्हलपरचं एक अशा एकूण आठ पदांवर भरती होणार आहे, असं अधिसूचनेत म्हटलं आहे.
हे वाचा - CBSE Class 10th Result: 'या' तारखेपर्यंत लागणार 10वीचा निकाल; आली मोठी अपडेट
शैक्षणिक पात्रता
OT टेक्निशियन आणि ICU टेक्निशियन : विज्ञान शाखेतून 12वी (10+2), तसंच मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीएस्सी (Theater Technology) किंवा समकक्ष पदवी. त्यात आयसीयू, मॅनिफोल्ड रूम आणि सीएसएसडीचं प्रशिक्षण समाविष्ट असणं आवश्यक. किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा थिएटर टेक्नॉलॉजी शाखेतला दोन वर्षांचा डिप्लोमा.
सीनिअर पीएचपी डेव्हलपर कम प्रोजेक्ट लीडर : आयटी किंवा कम्प्युटर सायन्समध्ये एम. एस्सी किंवा एमसीए किंवा बी. टेक. किंवा बी. ई. पदवी असणं गरजेचं. संबंधित क्षेत्रात कमीत कमी नऊ वर्षांचा अनुभव आवश्यक.
सीनिअर मोबाइल अॅप्लिकेशन डेव्हलपर : कम्प्युटर सायन्स किंवा आयटीमध्ये एम. एस्सी. किंवा एमसीए किंवा बी. टेक. किंवा बी. ई. पदवी असणं गरजेचं. संबंधित क्षेत्रात कमीत कमी नऊ वर्षांचा अनुभव आवश्यक.
इतका मिळणार पगार
OT टेक्निशियन आणि ICU टेक्निशियन : 22,178 रुपये प्रति महिना
सीनिअर पीएचपी डेव्हलपर कम प्रोजेक्ट लीडर आणि सीनिअर मोबाइल अॅप्लिकेशन डेव्हलपर : 68,000 रुपये प्रति महिना
अर्ज कसा करायचा?
इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाइन माध्यमातून रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. https://www.becil.com/ या अधिकृत वेबसाइटवर त्या संदर्भातली सर्व माहिती उपलब्ध आहे. ऑनलाइन अर्ज करताना काही तांत्रिक अडचणी आल्यास khuswindersingh@becil.com या ई-मेल आयडीवर ई-मेल पाठवता येऊ शकतो. तांत्रिक अडचणींव्यतिरिक्त अन्य अडचणी आल्यास maheshchand@becil.com या ई-मेल आयडीवर ई-मेल पाठवून किंवा 0120-4177860 या क्रमांकावर कॉल करून समस्यांचं निराकरण करता येऊ शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Jobs