१२ वी पाससाठी निघाल्या सरकारी नोकऱ्या, महिना ४७ हजार रुपये असेल पगार

१२ वी पाससाठी निघाल्या सरकारी नोकऱ्या, महिना ४७ हजार रुपये असेल पगार

जर तुम्ही पदवीधर आहात किंवा १२ वी पास आहात तर सरकारी नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, ०५ जानेवारी २०१९- जर तुम्ही पदवीधर आहात किंवा १२ वी पास आहात तर सरकारी नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. ग्रामीण बाल तांत्रिक शिक्षण संस्था दिल्लीने मॅनेजर, पर्यवेक्षक, क्लार्क आणि दुसऱ्या रिक्त पदांसाठी भरती सुरू केली आहे. या पदांसाठी १० जानेवारी २०१९ पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. १२ वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे.

या पदांसाठी आहे भरती- मॅनेजर, पर्यवेक्षक, क्लार्क आणि अन्य पदं

एकुण पदं- ७२१

अर्जाची शेवटची तारीख- १० जानेवारी २०१९

जागा- दिल्ली

मॅनेजर पदासाठी एकुण ३२ जागा उपलब्ध आहेत. यासाठी बीए उत्तीर्ण असणं आणि दोन वर्षांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्षदरम्यान असणं आवश्यक आहे. या पदासाठी १९, ९९० ते ६३, २०० एवढा पगार मिळेल.

अपर डिव्हिजन क्लार्कसाठी एकुण १४२ जागा उपलब्ध आहेत. यासाठी १२ वी सह कॉम्प्युटरची माहिती असणं आवश्यक आहे. या पदासाठी उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्ष असणं आवश्यक आहे. या पदाला १४, ८०० ते ४७, १०० रुपये महिना पगार मिळेल.

पर्यवेक्षक पदासाठी १०२ जागा रिक्त आहेत. याही पदासाठी १२ वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. वयाची अट १८ ते २५ एवढी आहे तर या पदाला महिना १२, ३०० ते ४१, ६०० रुपये पगार मिळू शकतो.

असं होईल निवड-

उमेदवारांची निवड लेखी परीक्षेनंतर मुलाखतीच्या आधारावर होईल.

असा भरा अर्ज-

उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. http://www.delhi.gov.in/wps/wcm/connect/DOIT_TT/trainingandtechnicaleducation/home

VIDEO : राज ठाकरे मोदींना टाळून राहुल गांधींना देणार का मुलाच्या लग्नाची पत्रिका?

First published: January 5, 2019, 12:34 PM IST

ताज्या बातम्या