Home /News /career /

Indian Army 2020: भारतीय सेनेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Indian Army 2020: भारतीय सेनेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर आहे. या रिक्रूटमेंट ड्राईव्हद्वारे 191 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

  नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : भारतीय सेनेकडून एसएससी ऑफिसर (SSC Officer in Indian Army) पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ज्या उमेदवारांना यासाठी अर्ज करायचा आहे, ते इंडियन आर्मीच्या अधिकृत वेबसाईटवर joinindianarmy.nic.in अप्लाय करू शकतात. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर आहे. या रिक्रूटमेंट ड्राईव्हद्वारे 191 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी अविवाहित इंजिनियर्स ग्रॅज्युएट महिला आणि पुरुष अप्लाय करू शकतात. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2020 पर्यंत आहे. शैक्षणिक पात्रता - या पदासाठी इंजिनियरिंगची डिग्री पास झालेले आणि इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षात असेलेले उमेवार अर्ज करू शकतात. वयोमर्यादा - या पदासाठी 1 एप्रिल 2021 पर्यंत वयोमर्यादा 20 ते 27 वर्ष असणं गरजेचं आहे. SSC(Tech) - 56 पुरुष SSCW(Tech) - 27 महिला

  (वाचा - नोकरीची सुवर्णसंधी! Supreme Courtमध्ये या पदांसाठी भरती; अर्ज करण्यासाठी जाणून घ्या डिटेल्स)

   निवड प्रक्रिया -
  उमेदवाराची निवड दोन टप्प्यात होईल, पहिली स्टेज पास झाल्यास, उमेदवाराला दुसऱ्या स्टेजमधील परीक्षा द्यावी लागेल. जे उमेदवार पहिल्या टप्प्यात नापास होतील, त्याना पुढे घेतलं जाणार नाही, त्यांना दुसऱ्या टप्प्यासाठी प्रवेश मिळणार नाही. अधिक माहितीसाठी उमेदवार इंडियन आर्मीच्या साईटवर भेट देऊ शकतात. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  पुढील बातम्या