IBPS Clerk 2020: 2557 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, या बँकांमध्ये नोकरीची संधी

IBPS Clerk 2020: 2557 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, या बँकांमध्ये नोकरीची संधी

IBPS Clerk 2020 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 23 ऑक्टोबर 2020 पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2020 आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर : इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सेलेक्शनने (IBPS)IBPS Clerk 2020 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. आयबीपीएस क्‍लर्क भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2020 आहे. या प्रक्रियेतून (IBPS Clerk application process) IBPS 2557 रिक्त पदांसाठी भरती करणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना प्राथमिक आणि मुख्य परीक्षेसाठी हजर राहावं लागणार आहे. तसंच योग्य कटऑफ मिळवणाऱ्या उमदवारांना पात्र ठरवलं जाणार असल्याचं, नोटिफिकेशनमधून सांगण्यात आलं आहे.

यापूर्वी IBPS ने 1557 जागांसाठी अर्ज मागवले होते. मात्र त्यानंतर पदांमध्ये वाढ केली असून आता 2557 पदांसाठी भरती होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

IBPS Clerk 2020 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 23 ऑक्टोबर 2020 पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2020 आहे.

शैक्षणिक पात्रता -

उमेदवार, सरकारी मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेत पदवीधर असणं आवश्यक आहे. ज्या राज्यासाठी उमेदवार अर्ज करत आहे, त्या उमेदवाराकडे त्या राज्यातील प्रादेशिक भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

ऑनलाईन मुख्य परीक्षा 24 जानेवारी 2021 रोजी आयोजित केली जाईल. तसंच प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट 1 एप्रिल 2021 रोजी जारी केली जाईल.

या भरती प्रक्रियेद्ववारे, बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda), कॅनरा बँक (Canara Bank), इंडियन ओव्हरसीज बँक (Indian Overseas Bank), यूको बँक (UCO Bank), बँक ऑफ इंडिया (Bank of India), सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India), पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank), यूनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India), बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra), इंडियन बँक (Indian Bank), पंजाब अँड सिंध बँक (Punjab & Sind Bank) मध्ये क्लर्क पदांसाठी नियुक्त केली जाईल.

Published by: Karishma Bhurke
First published: October 24, 2020, 1:55 PM IST
Tags:

ताज्या बातम्या