क्रीडा क्षेत्रात सरकारी नोकरीची संधी; विविध खेळांसाठी प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक हवे आहेत!

क्रीडा क्षेत्रात सरकारी नोकरीची संधी; विविध खेळांसाठी प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक हवे आहेत!

स्पोर्टस् ऑथॉरिटी ऑफ इंडिया (Sports Authority of India - SAI) अर्थात भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये 320 रिक्त जागांवर भरती होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 एप्रिल: स्पोर्टस् ऑथॉरिटी ऑफ इंडिया (Sports Authority of India - SAI) अर्थात भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये 320 रिक्त जागांवर भरती होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. कोच (Coach) आणि असिस्टंट कोच (Assistant Coach) अर्थात प्रशिक्षक आणि सहायक प्रशिक्षक या पदांवर ही भरती होणार आहे. 20 एप्रिलपासून 20 मेपर्यंतच्या काळात sportsauthorityofindia.nic.in या वेबसाइटवर जाऊन इच्छुक उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. या पदांवरची नियुक्ती कंत्राटी पद्धतीने असेल, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

रिक्त पदांचं विवरण : प्रशिक्षक (Coach) :एकूण100पदं. तिरंदाजी- 07,अॅथलेटिक्स -10,बॉक्सिंग -07,हॉकी -07,शूटिंग -07,वेटलिफ्टिंग -07,रेसलिंग (कुस्ती) -07,सायकलिंग -07,तलवारबाजी -07,ज्युडो -07,रोविंग -07,स्विमिंग -02,टेबल टेनिस -02,बास्केटबॉल -02,फुटबॉल -02,जिम्नॅस्टिक -02,कबड्‌डी आणि खो-खो -02,कयाकिंग -02,तायक्वांदो -02,व्हॉलीबॉल -02,वुशु –02.  सहायक प्रशिक्षक (Assistant Coach) :एकूण220पदं. तिरंदाजी- 13,अॅथलेटिक्स -20,बॉक्सिंग -13,हॉकी -13,शूटिंग -03,वेटलिफ्टिंग -13,रेसलिंग (कुस्ती) -13,सायकलिंग -13,तलवारबाजी -13,ज्युडो -13,रोविंग -13,स्विमिंग -07,टेबल टेनिस -07,बास्केटबॉल -06,फुटबॉल -10,जिम्नॅस्टिक -06,कबड्‌डी आणि खो-खो -07,कयाकिंग -06,तायक्वांदो -06,व्हॉलीबॉल -06,वुशु -06,हँडबॉल -03,कराटे -04,

हे ही वाचा-IPL मध्ये महाराष्ट्राचे 3 खेळाडू, एक यशस्वी, दुसरा फेल, तिसऱ्याला संधीच नाही

आवश्यक पात्रता : कोच आणि असिस्टंट कोच या दोन्ही पदांसाठी साई (SAI)किंवाNS NIS किंवा अन्य देशी किंवा विदेशी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोचिंगमध्ये डिप्लोमा आणि पाच वर्षांचा अनुभव आवश्यक. किंवा ऑलिम्पिक्स/वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत पदकविजेता/विजेती किंवा दोन वेळा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार विजेता/विजेती.

वेतनमान : कोच :1,05,000 रुपयांपासून 1,50,000 रुपयांपर्यंत. असिस्टंट कोच :41,420 रुपयांपासून 1,12,400 रुपयांपर्यंत वयोमर्यादा : कोच या पदासाठी जास्तीत जास्त 45 वर्षांपर्यंतच्या व्यक्ती अर्ज करू शकतात. असिस्टंट कोच या पदासाठी जास्तीत जास्त 40 वर्षांपर्यंतच्या व्यक्ती अर्ज करू शकतात.

निवड प्रक्रिया : इच्छुक उमेदवारांची निवड इंटरव्ह्यूच्या आधारे केली जाईल.  अधिक माहितीसाठी https://sportsauthorityofindia.nic.in/index1.asp?ls_id=17 या लिंकवर क्लिक करा.

First published: April 20, 2021, 9:17 AM IST
Tags: jobsports

ताज्या बातम्या