Home /News /career /

सरकारी नोकरीची संधी; NTPC मध्ये Executive, Specialist पदांसाठी भरती, असा करा अर्ज

सरकारी नोकरीची संधी; NTPC मध्ये Executive, Specialist पदांसाठी भरती, असा करा अर्ज

या पदांसाठी पात्र आणि इच्छुक असणारे उमेदवार अधिकृत वेबसाईटवर ntpccareers.net भेट देऊ शकतात. ज्या उमेदवारांनी आतापर्यंत या भरतीसाठी अर्ज केला नसल्यास, ते 15 एप्रिल 2021 पर्यंत आपला अर्ज करू शकतात.

  नवी दिल्ली, 11 एप्रिल : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने (NTPC Limited) एग्जिक्यूटिव्ह आणि स्पेशलिस्ट पदांसाठी भरतीबाबत नोटिफिकेशन (NTPC Recruitment 2021 sarkari nokari 2021) जारी केलं आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक असणारे उमेदवार अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन अर्ज करू शकतात. उमेदवार ntpccareers.net वर भेट देऊ शकतात. ज्या उमेदवारांनी आतापर्यंत या भरतीसाठी अर्ज केला नसल्यास, ते 15 एप्रिल 2021 पर्यंत आपला अर्ज करू शकतात. पदांची संख्या - एग्जिक्यूटिव्ह (सेफ्टी) - 13 पदं एग्जिक्यूटिव्ह (डाटा रिकव्हरी) - 5 जागा सिनियर एग्जिक्यूटिव्ह (सोलर) - एक जागा स्पेशलिस्ट (सोलर) - एक जागा

  (वाचा - महिना 7 लाख रुपये पगार, आवडीचं काम, राहणं-खाणंही फ्री; या कंपनीची जबरदस्त नोकरी)

  अर्ज करण्याची तारीख - 1 एप्रिल 2021 अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 एप्रिल 2021

  (वाचा - Bank of Baroda Recruitment 2021: बँक ऑफ बडोदामध्ये मोठी भरती, लगेचच करा अर्ज)

  प्रत्येक पदानुसार, शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. अधिकाधिक वयोमर्यादा 55 वर्ष आहे. जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 300 रुपये भरावे लागणार आहेत. तर आरक्षित वर्गातील कोणत्याही उमेदवाराला अर्ज करण्यासाठी पैसे भरावे लागणार नाहीत. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशनद्वारे संपूर्ण माहिती घेऊ शकतात.

  (वाचा - ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना आरामासाठी देतेय 1 आठवड्याचा पेड वीक ऑफ)

  अधिकृत नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Job alert, Jobs

  पुढील बातम्या