नवी दिल्ली, 9 जानेवारी : इंटेलिजेंस ब्यूरोमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी चांगली चांगली संधी आहे. त्यासाठी आजच अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जानेवारी 2021 आहे. केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत इंटेलिजेंस ब्यूरोमध्ये (IB) असिस्टेंट ऑफिसर (ACIO) ग्रेड- 2/एग्झिक्यूटिव्ह या 2000 पदांसाठी भरती आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकृत mha.gov.in वेबसाईटवर अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा -
इंटेलिजेंस ब्यूरोमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापिठातून बॅचलर डिग्री असणं आवश्यक आहे. या पदांसाठी बॅचलर्सच्या शेवटच्या वर्षातील, शेवटच्या सेमिस्टरचे विद्यार्थीही अर्ज करू शकतात. यासाठी केवळ एकच अट आहे की, विद्यार्थ्याचा फायनल रिझल्ट 9 जानेवारी 2021 पर्यंत जारी होणं गरजेचं आहे. या पदांसाठी अर्जदाराचं वय 18 ते 27 वर्ष असणं आवश्यक आहे.
असा करा अर्ज -
अधिकृत वेबसाईट mha.gov.in वर ऑनलाईन अर्ज करावा लागेल. त्यानंतर होमपेजवर What's New सेक्शनमध्ये एसीआयओ (acio) रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर एक नवा टॅब ओपन होईल. त्यापुढे प्रक्रिया फॉलो करुन अर्ज करावा लागेल.
अशी होईल निवड -
इंटेलिजेंस ब्यूरोमध्ये भरतीसाठी निवड प्रक्रिया लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. अर्ज करणारे उमेदवार अधिकृत वेबसाईटवर परीक्षा पॅटर्नबाबत अधिक माहिती मिळवू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Job