'या' संस्थेत सरकारी नोकरीची संधी; असा करा अर्ज

'या' संस्थेत सरकारी नोकरीची संधी; असा करा अर्ज

10वी, 12वी, डिप्लोमा, बीएससी, पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवार, ग्रुप ए, बी आणि सी या पदांसाठी अर्ज करू शकतात.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (All India Institute of Medical Science) अर्थात एम्स (AIIMS) दिल्लीने ग्रुप ए, बी आणि सी पदांसाठी (AIIMS Delhi Group A B C Recruitment 2020) सरकारी नोकरीसाठी व्हॅकेन्सी सुरू केली आहे. या भरतीसाठी योग्य आणि इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात. 19 नोव्हेंबर 2020 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

परीक्षा - एम्स दिल्ली ग्रुप ए, बी आणि सी

पदांची संख्या - 214

पात्रता - 10वी, 12वी, डिप्लोमा, बीएससी, पोस्ट ग्रॅज्युएट

वयोमर्यादा - पदांनुसार 27, 30, 35 आणि 45

पे स्केल - पे मॅट्रिक्स लेवल 11 (67700-208700 रुपये) पर्यंत प्रति महिना

नोकरीचं ठिकाण - दिल्ली

अर्ज करण्यासाठी फी -

ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये व्हॅकेन्सीसाठी, होणाऱ्या परीक्षेचा अर्ज करणाऱ्या जनरल, ओबीसी कॅटेगरीतील उमेदवारांना ऍप्लिकेशन फी 1500 रुपये भरावे लागणार आहेत. त्याशिवाय एससी, एसटी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीतील उमेदवारांना 1200 रुपये जमा करावे लागणार आहेत. फी पेमेंट ऑनलाईन क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि नेट बँकिंग किंवा एसबीआय चालानद्वारेही करता येणार आहे. पीडब्ल्यूडी कॅटेगरीतील उमेदवारांना ऍप्लिकेशन फी भरावी लागणार नाही.

(वाचा - Government job: Post Office मध्ये नोकरीची संधी; 69 हजारपर्यंत मिळेल वेतन)

ऑनलाईन अर्ज करण्याची आणि फी भरण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2020 आहे.

या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. त्यासाठी उमेदवाराला एम्सच्या अधिकृत वेबसाईट https://www.aiimsexams.org वर रजिस्टर करावं लागेल. त्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये योग्य ती माहिती भरून फॉर्म सबमिट करावा लागेल.

(वाचा - घरपोच मिळणाऱ्या LPG सिलेंडरचा हा नियम बदलणार, पुढील आठवड्यात नवी प्रक्रिया लागू)

या व्हॅकेन्सीबाबत अधिक माहितीसाठी उमेदवार ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊ शकतात. या व्हॅकेन्सीसाठी निवड प्रक्रिया कंप्यूटरआधारे परीक्षा आणि इंटरव्ह्यू आधारे केली जाणार आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: October 25, 2020, 6:01 PM IST
Tags:

ताज्या बातम्या