मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Government Jobs : इंडियन एअरफोर्समध्ये भरती, अर्ज करण्यासाठी उद्या शेवटची संधी

Government Jobs : इंडियन एअरफोर्समध्ये भरती, अर्ज करण्यासाठी उद्या शेवटची संधी

अर्ज करण्याचा अंतिम दिवस 17 फेब्रुवारी आहे. इच्छुक उमेदवारांनी कसा करायचा अर्ज जाणून घ्या.

अर्ज करण्याचा अंतिम दिवस 17 फेब्रुवारी आहे. इच्छुक उमेदवारांनी कसा करायचा अर्ज जाणून घ्या.

अर्ज करण्याचा अंतिम दिवस 17 फेब्रुवारी आहे. इच्छुक उमेदवारांनी कसा करायचा अर्ज जाणून घ्या.

  • Published by:  Kranti Kanetkar
मुंबई, 16 फेब्रुवारी: सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आपल्यासाठी खास सरकारी नोकरी करण्याची संधी आहे. इंडियन एअरफोर्सकडून भरतीची जाहिरात जारी करण्यात आली आहे. मॅनेजर आणि क्लर्क पदाच्या जागा रिक्त असल्याची माहिती मिळत आहे. इच्छुक उमेदवारांनी जाणून घ्या अर्ज करण्याची अंतिम तारीख, पात्रतेच्या अटी आणि कसा करायचा अर्ज. इच्छुक उमेदवारांना सिक्रेटरी आईएएफ बेनेवोलेंट एसोसिएशन, एएफजीआईएस भवन, सुब्रतो पार्क, नई दिल्ली- पिन नंबर- 110010 या पत्त्यावर आपला बायोडाटा आणि अर्ज पाठवायचा आहे. याशिवाय अधिकृत बेवसाईटवरूनही आपण अर्ज भरू शकता. 15 फेब्रुवारीपासून अर्ज भरण्याची सुरुवात झाली आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिवस 17 फेब्रुवारी 2020 असणार आहे. रिक्त जागा- 5 जुनियर क्लर्क (ईडीपी) -1 पद, जुनियर क्लर्क - 2 पद असिस्टेंट मॅनेजर रिसेप्सनिस्ट- 1 पद असिस्टेंट मॅनेजर(पर्सनल असिस्टेंट)-1 पद शैक्षणिक पात्रता- प्रत्येक पदासाठी वेगवेगळी योग्यता आवश्यक आहे. यासंबंधीची अधिक माहिती आपल्याला इंडियन एअरफोर्सच्या अधिकृत संकेतस्थळावरही मिळू शकते. अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडे किमान 10 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. वेतन- पदांनुसार पगार देण्यात येणार आहेत. साधारण 30 हजारपासून दरमहिना वेतन देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. तर वेतनाच्या 3 टक्के वर्षभरानंतर पगारवाढ होणार आहे. कसा करायचा अर्ज- इच्छुक उमेदवारांनी ऑफिशियल वेबसाईटवर भेट द्या. त्यांनी आपले डिटेल्स अपलोड करून अकाऊंट सुरू करावं. त्यानंतर इच्छुक उमेदवारांनी आपल्याला कोणत्या पोस्टसाठी अर्ज करायचा आहे त्यासाठी अर्जावर अप्लाय म्हणावं. दिलेली माहिती सबमिट करावी. हेही वाचा-HSC-SSC Board Exam : पेपरला उरले फक्त 24 तास...कसा करायचा अभ्यास हेही वाचा-HSC-SSC Board Exam : परीक्षेला जाता जाता...या गोष्टी करायला अजिबात विसरू नका हेही वाचा-इंग्लिश विषय अवघड नाही, पास होण्यासाठी करा 'या' गोष्टी
First published:

पुढील बातम्या