Home /News /career /

Sarkari Naukari 2020: रेल्वेमध्ये पुन्हा एकदा मेगाभरती, जाणून घ्या अर्ज करण्याची अंतिम मुदत

Sarkari Naukari 2020: रेल्वेमध्ये पुन्हा एकदा मेगाभरती, जाणून घ्या अर्ज करण्याची अंतिम मुदत

10 वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी, रेल्वेमध्ये 2792 जागांसाठी भरती

    मुंबई, 31 जानेवारी: Sarkari Naukari 2020: भारतीय रेल्वेने पुन्हा एकदा मेगाभरती कऱण्याचा निर्णय घेतला आहे. 10 वी पास असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेनं पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात भरती होणार असल्याचं सर्क्युलेशन काढलं आहे. (Eastern Railway Region ER Kolkata)इथे अप्रायन्टीसह वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. उमेदवाराला यासाठी लेखी परीक्षा आणि मुलाखत दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर निवडण्यात येणार आहे. या भरतीचे अधित तपशिल जाणून घ्या. एकूण जागा आणि अर्जाची मुदत रेल्वेमध्ये 2792 पदांसाठी भरती केली आहे. उमेदवारानं अर्ज करण्यासाठी http://ER.gov.in/ संकेत स्थळाला भेट द्यावी. 14 फेब्रुवारी ते 13 मार्च 2020 उमेदवार अर्ज करू शकतात. ऑनलाईन फी जमा करण्याची अंतिम मुदत 13 जानेवारी आहे. तर परीक्षेची तारीख अद्याप नक्की नसल्यानं अर्ज भरलेल्या उमेदवारांना ती ई-मेल अथवा sms द्वारे कळवण्यात येईल. जनरल आणि OBC उमेदवारांसाठी 100 रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे. तर इतर SC/ST/PH आणि महिलांसाठी कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही. हेही वाचा-Budget 2020 : 1 फेब्रुवारीपासून बदलणार या 6 गोष्टी, जाणून घ्या बजेटमध्ये काय असण शैक्षणिक पात्रता- 15 ते 24 वर्ष वयोगटातील सर्व उमेदवार या जागांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करणारा उमेदवार किमान 10वी पास असणं आवश्यक आहे. कसा कराल अर्ज इच्छुक आणि पात्र उमेदवार http://ER.gov.in/ या वेबसाइटला भेट द्या.त्यावर रजिस्ट्रेशन करा. त्यानंतर न्यूज सेक्शन किंवा अनाऊंसमेंट सेक्शनला पदांसाठी भरती असा पर्याय असेल त्यावर क्लिक करून आवश्यक ती माहिती भरा. फोटो अपलोड करा आणि सही करा. त्यानंतर अर्ज आणि फी सबमिट करा. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यावर, अर्जाची प्रिंट घ्या. हेही वाचा-Budget 2020: वडिलांचं निधन झाल्यानंतरही हे अधिकारी करताहेत 'बजेट'चं काम
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Government job, Job requirement, Job vacancy, Jobs apply, Sarkari Naukari

    पुढील बातम्या