मुंबई, 30 जानेवारी: अमेरिकेमध्ये आर्थिक मंदीच्या संकटाची चाहूल लागल्यामुळे अनेक कंपन्यांनी कर्माचारी कपात सुरू केली आहे. असं असलं तरीही भारतीय आयटी क्षेत्रातून एक चांगली बातमी समोर आली आहे. आयटीमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही बातमी दिलासा देणारी आहे. टेक जायंट गुगलनं फुल स्टॅक इंजिनीअर आणि सीनिअर सॉफ्टवेअर इंजिनीअर पदासाठी कर्मचारी भरती सुरू केली आहे. कंपनीच्या बेंगळुरू येथील कार्यालयामध्ये या कर्मचाऱ्यांची गरज आहे. 'टेक गिग'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
सीनिअर सॉफ्टवेअर इंजिनीअरपदाच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या:
1. उमेदवाराला प्रॉडक्ट किंवा सिस्टीम डेव्हलपमेंट कोड कसा लिहायचा याचा चांगला अनुभव असणं आवश्यक आहे.
2. उमेदवारांना इतर इंजिनीअर्सनी डेव्हलप केलेल्या रिव्ह्युविंग कोडचं चांगलं ज्ञान असलं पाहिजे. कारण, त्यांना सॉफ्टवेअर क्वालिटी सुनिश्चित करण्यासाठी फीडबॅक द्यावा लागेल.
तुमच्या जॉब अप्लिकेशनसोबत Cover Letter नसेल तर नोकरी मिळत नाही? एक्सपर्ट्सनी दिलं परफेक्ट उत्तर
3. उमेदवाराने एक्झिस्टिंग डॉक्युमेंटेशन किंवा शैक्षणिक कंटेंटमध्येदेखील योगदान दिलं पाहिजे. प्रॉडक्ट किंवा प्रोग्रॅममधील गरजांवर आधारित कंटेंट स्वीकारता आला पाहिजे.
4. ट्रायएज प्रॉडक्ट किंवा सिस्टम इश्युज, समस्यांचे स्रोत, हार्डवेअर, नेटवर्क किंवा सर्व्हिस ऑपरेशन्स आणि गुणवत्तेवर होणारे परिणाम यांचं विश्लेषण करून डीबग/ट्रॅक/निराकरण करता आलं पाहिजे.
5. उपलब्ध तंत्रज्ञानाबाबत निर्णय घेण्यासाठी स्टेकहोल्डर्स आणि सहकाऱ्यांबरोबर डिझाईन रिव्ह्यू करता आले पाहिजेत.
सीनिअर सॉफ्टवेअर इंजिनीअरपदाच्या पात्रता:
1. बॅचलर पदवी किंवा समतुल्य प्रत्यक्ष कामाचा अनुभव पाहिजे.
2. एक किंवा अधिक प्रोग्रॅमिंग भाषांमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि डेटा स्ट्रक्चर्स/अल्गोरिदमचा पाच वर्षांचा अनुभव पाहिजे.
3. सॉफ्टवेअर प्रॉडक्ट्सची चाचणी, देखरेख किंवा लाँच करण्याचा तीन वर्षांचा अनुभव आणि सॉफ्टवेअर डिझाइन आणि आर्किटेक्चरचा 1 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
4. एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टममध्ये काम करण्याचा तीन वर्षांचा अनुभव गरजेचा आहे.
फुल स्टॅक इंजिनीअरपदाच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या:
1. उमेदवाराला प्रॉडक्ट किंवा सिस्टीम डेव्हलपमेंट कोड कसा लिहायचा हे माहित असलं पाहिजे.
2. उमेदवाराला टेक्नॉलॉजीबाबत निर्णय घेण्यासाठी स्टेकहोल्डर्स आणि सहकाऱ्यांबरोबर डिझाईन रिव्ह्यू करता आले पाहिजेत.
3. उमेदवाराला इतर डेव्हलपर्सनी डेव्हलप केलेले कोड रिव्ह्यु कसे करावे हे माहीत असलं पाहिजे. सर्वोत्तम पद्धती निश्चित करण्यासाठी फिडबॅक देता आला पाहिजे.
4. उमेदवाराने एक्झिस्टिंग डॉक्युमेंटेशन किंवा शैक्षणिक कंटेंटमध्येदेखील योगदान दिलं पाहिजे. प्रॉडक्ट किंवा प्रोग्रॅममधील गरजांवर आधारित कंटेंट स्वीकारता आला पाहिजे.
फुल स्टेक इंजिनीअरपदाच्या पात्रता:
1. पदव्युत्तर पदवी किंवा कॉम्प्युटर सायन्स विषयातील पीएच.डी. किंवा संबंधित तांत्रिक क्षेत्रातील अनुभव गरजेचा आहे.
2. फुल स्टॅक डेव्हलपमेंटमध्ये दोन वर्षांचा अनुभव गरजेचा आहे. याशिवाय, जावा, पायथॉन, गो, C++ कोडबेसेस, जावा स्क्रिप्ट, टाइप स्क्रिप्ट, एचटीएमएल, सीएसएस, इत्यादींसह फ्रंट-एंड अनुभव असला पाहिजे.
3. अॅक्सेसेबल तंत्रज्ञान विकसित करण्याचा अनुभव पाहिजे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Google, Job, Job alert