2020 मध्ये Google करणार मेगाभरती! भारतीयांनाही मिळणार संधी, असा करा अर्ज

2020 मध्ये Google करणार मेगाभरती! भारतीयांनाही मिळणार संधी, असा करा अर्ज

गुगलमध्ये सर्च करू नका GOOGLE देतंय नोकरी, जाणून घ्या कसा करायचा अर्ज

  • Share this:

मुंबई, 22 डिसेंबर: तुम्ही नोकरीची संधी शोधत असाल तर नव्या वर्षात गुगल तुमच्यासाठी खास नोकरीची संधी घेऊन आलं आहे. दिग्गज टेक्नोलॉजी असलेली गुगल कंपनी भारतासह अन्य देशांमधून तब्बल 3800 कर्मचारी घेणार असल्याची माहिती मिळत आहे. गुगलकडून याबाबत सांगण्यात आलं आहे. 2020मध्ये गुगलने आपल्या कंपनीसाठी 3 हजार 800 कर्मचारी भरण्याचा निर्णय घेतला आहे.  Google Operations Centreचे वाईस प्रेसिडेंट टोरी डिकरसन यांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या वर्षात गुगल अमेरिकेत गुगुल ऑपरेशन सेंटर सुरू करणार असल्याचं सांगितलं. या सेंटरद्वारे भारत आणि फिलीपींमध्ये आपली पोहोच वाढवणं हा हेतु गुगलचा असणार आहे.

गुगल कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी काय करावं लागेल?

https://careers.google.com/ या संकेतस्थळावर तुम्ही भेट देऊन कोणत्या पदांसाठी जागा रिक्त आहेत ते पाहू शकता. या संकतेस्थळावर तुम्ही भेट दिल्यानंतर तुम्हाला ज्या विभागासाठी अर्ज भरायचा आहे तो पर्याय निवडा आणि अर्ज भरा. अर्ज भरल्यानंतर तुमची चाचणी होईल. ही चाचणी उत्तीर्ण होणं कठीण असतं. त्यामुळे या परीक्षेची तयारी आधीपासून करायला सुरुवात करावी. ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर तुमची मुलाखतही होईल. 20 लाख लोकांमधून केवळ 5 हजार उमेदवार निवडले जातात. त्यातूनही मुलाखतीमधून चाळण लावली जाते आणि त्यानंतर अंतिम उमेदवारांची निवड केली जाते.

वाचा-सांभाळा लहान मुलांचं आरोग्य, असं करा त्यांच्या आहाराचं नियोजन

असं म्हणातात गुगलच्या ऑफिसमधली मुलाखत ही जगातील सर्वात कठीण मुलाखत असते. ह्या मुलाखतीत पास होणं अवघड असतं. मुलाखतीमध्ये अनेकवेळा संभ्रम निर्माण करणारे प्रश्न जाणीवरपूर्वक विचारले जातात. वेगवेगळ्या परिस्थितीत तुम्ही काय निर्णय घ्याल याची चाचणी घेतली जाते. प्रत्येक गोष्टीमागचं लॉजिक तुम्हाला सांगावं लागतं त्यामुळे ही मुलाखत यशस्वीरित्या पार करणं फार कठीण मानलं जातं.

गुगलमधील कर्मचाऱ्यांना त्यांच्या नॉलेज आणि कामानुसार पॅकेज दिलं जातं. त्य़ांना मिळणाऱ्या सोय़ीसुविधाही उत्तम असतात.

गुगलमध्ये नोकरी करण्यासाठी पात्रता

उमेदवाराला इंग्रजी भाषेची उत्तम जाण, उत्तम लिखाणाचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

उमेदवाराजवळ संगणकाचं उत्तम ज्ञान असणं आवश्यक आहे.

उमेदवाराचा आय क्यू लेवल, हजरजबाबीपणा, चिकाटी, तप्तरता ही मुलाखतीत तपासली जाते.

शैक्षणिक पात्रता नोकरीला अनुसरून असणं आवश्यक आहे.

वाचा-ऑफिसमधून निघण्यासाठी उशीर झाला तर या 5 गोष्टी कायम लक्षात ठेवा!

Published by: Kranti Kanetkar
First published: December 22, 2019, 8:25 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading