मुंबई, 14 फेब्रुवारी : अकरावी प्रवेशासाठी (admission 11th) मुदतवाढ देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. कॉलेजमध्ये काही अपरिहार्य कारणामुळे प्रवेश देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी संबंधित पर्याय उपलब्ध करून दिला गेला आहे. सध्याच्या आपत्कालीन आरोग्य परिस्थितीमध्ये शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी शालेय शिक्षण विभागाचा निर्णय आहे.
ज्या विद्यार्थ्यांना काही अपरिहार्य कारणास्तव आपला प्रवेश घेता आला नाही, त्यांना प्रवेश निश्चित करता यावा यासाठी इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत FCFS 2.0 ला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. Participat in FCFS मधून अर्ज करणे व allotment घेणे - दि.16.02.2021 रोजी स.10:00 वा.पर्यंत वेळ देण्यात आला आहे. Allotment मिळालेल्या मुलांनी आपला प्रवेश विद्यालयात निश्चित करण्यासाठी दि.16.02.2021 रोजी संध्याकाळी 06:00 वाजेपर्यंत वेळ दिला आहे. तर प्रवेश रद्द करण्यासाठी 15.02.2021 रोजी संध्याकाळी 06:00 वाजेपर्यंत मुदत दिली आहे.
IND vs ENG : अजिंक्य रहाणेचा स्पेशल विक्रम, विराटलाही जमला नाही
तरी सर्व विद्यार्थ्यांनी मिळालेल्या वाढीव वेळेत आपला प्रवेश घ्यावा. ही 2020-21 साठी शेवटची संधी असेल अशी माहिती शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक दत्तात्रय जगताप यांनी दिली आहे.
Alert!ATM कार्डबाबत फसवणुकीचा नवा प्रकार समोर;असं काही दिसल्यात त्वरित सावध व्हा
मागील 11महिने राज्यात कोरोना आल्याने यंदाच्या शैक्षणिक वर्ष कठीण झाले आहे. पहिल्यांदा शैक्षणिक वर्ष पुढे ढकलावे की, काय अशी चर्चा सुरू असतानाच तुर्तास तब्बल सहा महिने कालावधी राज्यातील महाविद्यालय शाळा बंद ठेवण्या आले होते. आता नुकतेच दोन महिन्यांपूर्वी राज्यातील काही शाळा मोजक्याच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आली आहेत. याा शाळा सुरू करण्यापूर्वीच अनेक ठिकाणी शालेय शिक्षक संघटनांनी विरोध केला होता. तरी देखील राज्य सरकारने ठाम भूमिका घेत आता राज्यात काही प्रमाणात शाळा सुरू केले आहे. पुण्यात महाविद्यालय देखील सुरू होत आहेत. राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रिया होत असताना अनेक विद्यार्थ्यांना सध्याच्या आरोग्याच्या संकटामुळे प्रवेश मिळवण्यास समस्या आल्या आहे, हेच लक्षात घेत राज्य सरकारने अकरावी प्रवेेश प्रक्रिया यास मुदतवााढ दिली आहे.