ECGC PO Recruitment 2021, Sarkari Naukri 2021: एक्सपोर्ट क्रेडिट गॅरेंटी कॉर्पोरेशन (ECGC) ने प्रोबेशनरी ऑफिसर पदांवर योग्य उमेदवारांच्या भरतीसाठी अधिकृत नोटिफीकेशन जारी केलं आहे. जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार योग्यता, वेतन, अर्जाचे शुल्क आदी सह सर्व आवश्यक तपशील दिला आहे. इच्छुक उमेदवार नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाइट ecgc.in वर जाऊ शकता.
प्रोबेशनरी ऑफिसरच्या एकूण 59 पदांवर उमेदवारांची भरती होईल, त्यातील 25 पदे आरक्षित नाहीत. निवड झालेल्या उमेदवारांना 32,795 रुपयांपासून 62,315 रुपयांच्या वेतनश्रेणीवर घेतले जाईल. ऑनलाईन अर्ज 01 जानेवारी 2021 पासून सुरू झाले असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2021 आहे. ऑनलाईन परीक्षा 14 मार्च रोजी घेण्यात येईल, ज्याचा निकाल 31 मार्चपर्यंत जाहीर होईल. कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या पदांच्या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्जासाठी वयोमर्यादा 21 ते 30 ठरविण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी आरक्षित नसलेल्या विभागातील उमेदवारांना 700 रुपये आणि आरक्षित उमेदवारांना 125 रुपये जमा करावे लागतील. अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
येथे करा क्लिक