मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Goa Board HSSC Result 2020 : बारावीचा निकाल जाहीर, काही क्षणांतच सरकारची वेबसाइट डाऊन

Goa Board HSSC Result 2020 : बारावीचा निकाल जाहीर, काही क्षणांतच सरकारची वेबसाइट डाऊन

गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (GBSHSE) 12 वीचा निकाल आज जाहीर झाला आहे. gbshse.gov.in या वेबसाइटवर तुम्ही बारावीचा निकाल पाहू शकता.

पणजी, 26 जून : गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (GBSHSE) 12 वीचा निकाल आज जाहीर झाला आहे. gbshse.gov.in या वेबसाइटवर तुम्ही बारावीचा निकाल पाहू शकता. पाच वाजता हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. स्क्रोलने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी हा निकाल 86.83 टक्के इतका निकाल लागला आहे. 2019  पेक्षा 3 टक्क्यांनी निकाल कमी लागला आहे. बारावीचा निकाल या लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती गेल्या आठवड्यात समोर आली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. अखेर शुक्रवारी 26 जून रोजी हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परिक्षेसाठी यंदा 18,121 विद्यार्थी बसले होते. यापैकी मुलींची संख्या 9317 तर मुलांची संख्या 8804 इतकी होती. 2,367 विद्यार्थी यावर्षी नापास झाले आहेत.

दरम्यान 5 वाजता ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर काही वेळातच निकाल चेक करण्याची सरकारची साइट डाऊन झाली आहे. विद्यार्थ्यांनी संयम बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

कोरोनाचा (Coronavirus) संसर्ग आणि वाढता धोका लक्षात घेऊन 20 मार्चनंतर परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. 20 मे ते 22 मे 2020 या कालावधीत प्रलंबित एचएसएससी परीक्षा घेण्यात आल्या. गुणपत्रिका मिळण्याबाबत बोर्ड आणि महाविद्यालय एकत्रित निर्णय घेऊन घोषणा करेल असं सांगण्यात आलं आहे.

निकाल कसा पाहाल

gbshse.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. या लिंकवर क्लिक केल्यानंतर Goa HSSC Result 2020 असं लिहिलेलं असेल. तिथे आवश्यक ते तपशील भरून आपला निकाल आपण पाहू शकता. या निकालाची आपण प्रिंट किंवा पीडीएफ फाईल तुम्ही घेऊ शकता.

संपादन - जान्हवी भाटकर

First published: