Goa Board Exam 2021: बारावी परीक्षा फी भरण्यासाठी मुदतवाढ

Goa Board Exam 2021: बारावी परीक्षा फी भरण्यासाठी मुदतवाढ

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 2021 बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी शुल्क भरण्याची तारीख 5 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.

  • Share this:

पणजी, 3 फेब्रुवारी : (Goa Board) गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 2021 बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी शुल्क भरण्याची तारीख 5 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. कोरोना महामारीमुळे यावर्षी परीक्षेसाठी नोंदणी वेळापत्रक आणि परीक्षांनाही उशीर झाला आहे. त्यामुळे विलंब शुल्क न आकारता आता 5 फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात, असं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, विद्यार्थी 30 जानेवारीपर्यंत उशीरा फीशिवाय नोंदणी करू शकतात आणि 12 फेब्रुवारीपर्यंत उशीरा फी आकारली जाऊन नोंदणी करू शकतात असं मंडळाकडून यापूर्वी जाहीर करण्यात आलं होतं. मात्र आता 5 फेब्रवारीपर्यंत विलंब शुल्क आकारला जाणार नाही. विद्यार्थ्यांना यावर्षी त्यांच्या शाळेमार्फत फी भरावी लागणार आहे.

(वाचा - CBSE 10th 12th Exam: दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचं टाइमटेबल जाहीर)

गोवा बोर्डाने यापूर्वी कोविड-19 मुळे दहावी आणि बारावीची परीक्षा यावर्षी एका महिन्याहून अधिक उशीरा होत असल्याचं सांगितलं होतं. बारावीची परीक्षा 26 ए्प्रिलपासून 17 केंद्रांवर घेण्यात येणार आहे आणि 7 मे रोजी संपेल. तर प्रॅक्टिकल परीक्षा 1 एप्रिलपासून सुरू होणार आहे.

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 13 मेपासून सुरू होणार असून 4 जून रोजी संपणार आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! कोणीच होणार नाही नापास; CBSE चा नवीन नियम

दरम्यान, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी CBSE च्या नव्या नियमानुसार, दहावीचा विद्यार्थी गणित किंवा विज्ञान विषयात नापास झाला, आणि त्याने ऐच्छिक विषय आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स घेतलेल्या कौशल्याधारित विषयात उत्तीर्ण झाला, तर त्याला पास झाल्याचं समजलं जाईल. त्यामुळे विद्यार्थ्याचं वर्ष वाया जाणार नाही, असं सीबीएसई शाळेतील शिक्षकांचं म्हणणं आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: February 3, 2021, 11:13 AM IST
Tags: Examgoa

ताज्या बातम्या