नागपूर, 24 जुलै: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय नागपूर (GMC Nagpur Recruitment 2021) इथे लवकरच मोठ्या प्रमाणावर पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तब्बल 100 जागांसाठी ही भरती होणार आहे. सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, आहारतज्ञ आणि वरिष्ठ निवासी अधिकारी या पदांसाठी ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी हजार राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 26 जुलै 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)
कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी (Junior Medical Officer)
आहारतज्ञ (Dietitian)
वरिष्ठ निवासी अधिकारी (Senior Resident)
हे वाचा - Sarkari Naukri: केंद्रीय विद्यालयांमध्ये पदभरती सुरू; लवकर करा अर्ज
शैक्षणिक पात्रता
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - एम. सी. एच. किंवा डी. एम.
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - एम. डी. किंवा एम. एस. आणि एक वर्षांचा अनुभव
कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी (Junior Medical Officer) - एम. डी. किंवा एम. एस.
आहारतज्ञ (Dietitian) - बी. एस. सी. होम सायन्स
मुलाखतीची तारीख - 26 जुलै 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Jobs