मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

IT क्षेत्रात मिळवा गलेलठ्ठ पगाराची नोकरी, डिग्रीचीही गरज नाही!

IT क्षेत्रात मिळवा गलेलठ्ठ पगाराची नोकरी, डिग्रीचीही गरज नाही!

आयटी क्षेत्रामध्ये कॉलेज डिग्री नसेल तरीही मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

आयटी क्षेत्रामध्ये कॉलेज डिग्री नसेल तरीही मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

आयटी क्षेत्रात तुमच्याकडे चांगला अनुभव आणि कौशल्य असलं आणि तुम्ही ते दाखवून देऊ शकलात, तर केवळ पदवीअभावी काही अडत नाही.

मुंबई, 21 सप्टेंबर : नोकरीमध्ये भरपूर पगाराची अपेक्षा असेल, तर शिक्षण तर हवंच; मात्र त्याहीपेक्षा अनुभव जास्त महत्त्वाचा असतो. विशेषतः आयटी क्षेत्रात अनुभवाच्या जोरावरच वरच्या पदापर्यंत पोहोचता येतं. शिकणं, पदवी घेणं महत्त्वाचं आहेच; मात्र आयटी क्षेत्रात तुमच्याकडे चांगला अनुभव आणि कौशल्य असलं आणि तुम्ही ते दाखवून देऊ शकलात, तर केवळ पदवीअभावी काही अडत नाही. एखादं सर्टिफिकेशन किंवा एखादी असोसिएट डिग्री असली, तरी या क्षेत्रात मोठा पगार मिळवता (High Paying Tech Jobs Without A College Degree) येऊ शकतो. अशा काही संधींबद्दल जाणून घेऊ या. कम्प्युटर प्रोग्रामर प्रोग्रामिंग लँग्वेज लिहिणं, अपडेट करणं किंवा त्यातल्या समस्या सोडवणं हे कम्प्युटर प्रोग्रामरचं (Computer Programmer) महत्त्वाचं काम असतं. कोडिंग करताना झालेल्या चुका दुरुस्तीसाठी डिबगिंग करणं, कम्प्युटरसाठी सुविधा तयार करणं, ऑपरेटिंग सिस्टिम्स मेन्टेन करणं या इतर जबाबदाऱ्या असतात. या पदासाठीचा सरासरी वार्षिक पगार – 39,85,487 रुपये ज्युनिअर डेटा अ‍ॅनालिस्ट ज्युनिअर डेटा अ‍ॅनालिस्टला (Junior Data Analyst) प्रामुख्यानं वरिष्ठ डेटा अ‍ॅनालिस्टला सहकार्य करण्याचं काम असतं. यात डेटा रिट्रायव्हिंग, क्लीनिंग आणि ऑर्गनायझिंग यांचा समावेश असतो. डेटा अ‍ॅनालिस्ट म्हणून काम करायचं असेल तर स्वयंशिक्षण महत्त्वाचं असतं. उदा. एखादी प्रोग्रामिंग भाषा यायला हवी, प्रत्येक क्षेत्रातला डेटा कसा वेगवेगळा असतो, याची जाण हवी. तसंच डेटा सायन्समधले कोर्सेस करण्याची तयारी हवी. म्हणजेच कॉलेजमधली पदवी नसली, तरी या क्षेत्रातलं ज्ञान आणि अनुभव तुमच्याकडे असला पाहिजे. या पदासाठीचा सरासरी वार्षिक पगार – 35,99,991 रुपये कम्प्युटर सॉफ्टवेअर इंजिनीअर कम्प्युटर सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करताना, फायनान्स, मार्केटिंग, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट आणि आणखी इतर शाखांमध्ये काम करावं लागतं. प्रत्येक विभागाचं काम सुरळीत सुरू राहण्यासाठी तांत्रिक जबाबदारी पार पाडावी लागते. वेगवेगळ्या उद्योगांसाठी सॉफ्टवेअर सोल्युशन्स तयार करणं, तसंच फ्लो चार्ट, लेआउट, सूचना, कोडिंग यांच्या माध्यमातून सॉफ्टवेअरचं डॉक्युमेंटेशन करणं याही जबाबदाऱ्या या व्यक्तीकडे असतात. या पदासाठीचा सरासरी वार्षिक पगार – 84,96,652 रुपये सॉफ्टवेअर आर्किटेक्ट क्लायंटच्या गरजेनुसार टेक्निकल आणि अ‍ॅनालिटिकल कौशल्य वापरून सिस्टीम तयार करणं हे यांचं काम असतं. प्रोग्रामिंग लँग्वेज आणि ऑपरेटिंग सिस्टिम्स यांचा भरपूर अभ्यास व त्यातलं उत्तम कौशल्य यांच्याकडे असावं लागतं. एखादं सॉफ्टवेअर ग्राहकांना वापरण्यायोग्य करण्यासाठी सॉफ्टवेअर आर्किटेक्टला टेक्निकल लीडर्स, इंजिनीअर्स आणि इतर डेव्हलपर्स यांच्यासोबत मिळून काम करावं लागतं. या पदासाठीचा सरासरी वार्षिक पगार –1,10,91,819 रुपये वेब डेव्हलपर फ्रंटएंड, बॅकएंड आणि फुल स्टॅक असे वेब डेव्हलपरचे (Web Developer) प्रकार असतात. युझर वेबसाइटचा जोभाग पाहतात, तो तयार करण्याचं काम फ्रंटएंड डेव्हलपरचं असतं. त्यासाठी ग्राफिक डिझायनर, टेम्पलेट यांचा वापर करतात किंवा स्वतःच ती वेबसाइट डिझाइन करतात. त्याच्यासाठी कोड तयार करून त्याद्वारे ते तयार केलं जातं. वेबसाइटसाठी ज्या सोयी लागणार आहेत, त्या सुरळीत ठेवण्याचं काम बॅकएंड डेव्हलपरकडे असतं. यात डेटाबेस सुरळीत ठेवणं, अ‍ॅप्लिकेशन इंटिग्रेशन आणि समस्या निवारण या गोष्टी येतात. या दोन्हींमध्ये फुल स्टॅक डेव्हलपर काम करतो. अनेक जण या क्षेत्रातलं शिक्षण ऑनलाइन क्लास करून, स्वतःच्या स्वतः शिकून घेण्याला प्राधान्य देतात. क्लायंटला जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करतो त्याच्याकडे जास्त ज्ञान आहे, असं समजलं जातं. या पदासाठीचा सरासरी वार्षिक पगार – 57,65,322 रुपये DevOps इंजिनीअर अंतर्गत प्रणालीसाठी सॉफ्टवेअर सोल्युशन्स तयार करणं, अपग्रेड करणं व त्याची अंमलबजावणी करणं हे DevOps इंजिनीअरचं काम असतं. या पदावर काम करण्यासाठी सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यात 5 किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांचा अनुभव असावा लागतो. या पदासाठीचा सरासरी वार्षिक पगार – 57,65,322 रुपये
First published:

पुढील बातम्या