मराठी बातम्या /बातम्या /करिअर /General Knowledge :'राज्य फुलपाखरू' Blue Mormon विषयी तुम्हाला काय माहिती आहे?

General Knowledge :'राज्य फुलपाखरू' Blue Mormon विषयी तुम्हाला काय माहिती आहे?

Maharashtra state butterfly : महाराष्ट्राचे अधिकृत फुलपाखरू असलेल्या ब्ल्यू मॉरमॉनबद्दल तुम्हाला किती माहिती आहे?

Maharashtra state butterfly : महाराष्ट्राचे अधिकृत फुलपाखरू असलेल्या ब्ल्यू मॉरमॉनबद्दल तुम्हाला किती माहिती आहे?

Maharashtra state butterfly : महाराष्ट्राचे अधिकृत फुलपाखरू असलेल्या ब्ल्यू मॉरमॉनबद्दल तुम्हाला किती माहिती आहे?

  • Local18
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 6 फेब्रुवारी : महाराष्ट्र राज्यात विपूल नैसर्गिक संपत्तीसह वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि पक्षी देखील आढळतात. राज्यातील प्रत्येक प्राण्यांचं संरक्षण करण्याचा प्रयत्न वन्य प्रेमी करत असता. वन्य प्रेमींच्या या प्रयत्नांना सरकारकडूनही बळ देण्याचा प्रयत्न केला जातो. डोळ्यांना नेत्रसुख देणाऱ्या फुलपाखरांच्या संवर्धनासाठी देखील महाराष्ट्र सरकार गंभीर आहे. राज्य सरकारनं या धोरणांचा भाग म्हणून 'ब्ल्यू मॉरमन' हे राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केलं आहे.

देशातील पहिले राज्य

महाराष्ट्र सरकारनं 2015 साली राज्य फुलपाखरूची घोषणा केली. यापूर्वी राज्य सरकारनं राज्याचा प्राणी, फळ आणि फुल याची घोषणा केली होती. पण, फुलपाखरूची घोषणा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे. राज्य सरकारनं तेव्हा जाहीर केलेल्या माहितीनुसार राज्यात एकूण 225 प्रजातींच्या फुलपाखरांची नोंद झाली असून देशाच्या एकुण फुलपाखरांपैकी 15 टक्के महाराष्ट्रात आढळतात.

'ब्लू मॉरमॉन' चं वैशिष्ट्य

फुलपाखरांच्या आकाराचा विचार केला तर ब्ल्यू मॉरमॉन दुसऱ्या क्रमांकावर आहे. सदर्न बर्डविंगनंतर त्याचा क्रमांक लागतो. हे फुलपाखरू मखमली काळ्या रंगाचे असून त्याच्या पंखावर निळ्या रंगाच्या आकर्षक खुणा असतात. त्याचबरोबर शरीराकडील एका बाजूला लाल ठिपका आढळतो.

पोपटाची करामत मालकाच्या अंगलट! 75 लाखांच्या दंडासह दोन महिने तुरुंगात

हे फुलपाखरू महाराष्ट्रातील सिंधुदूर्ग जिल्ह्यात प्रामुख्यानं आढळतं. त्याचबरोबर भारतासह श्रीलंकेतही आढळते. देशात महाराष्ट्रसह दक्षिण भारतामधील राज्य आणि पूर्व किनारपट्टीवर हे फुलपाखरू आढळत असल्याची माहिती 'विकीपिडीया' मध्ये देण्यात आली आहे.

ब्ल्यू मॉरमॉनचे वैज्ञानिक नाव हे papilio polymnestor आहे. हे फुलपाखरू papilioniade या कुटुंबाचा भाग आहे. निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचा आणि अभ्यासाचा विषय असलेल्या फुलपाखराच्या संवर्धनाची मागणी सातत्यानं करण्यात येत होती. त्या मागणीची दखल घेऊन राज्य सरकारनं सात वर्षांपूर्वी ही घोषणा केली आहे.

झाशीमधल्या गावात होते ‘महारानी कुतिया’ची पूजा; गावकऱ्यांचं श्रद्धास्थान

देशभर 2 ते 8 ऑक्टोबर दरम्यान दरवर्षी 'वाईल्ड लाईफ विक' साजरा केला जातो. या काळात बटरफ्लाय फेस्टिव्हलचंही आयोजन करण्यात येतं. फुलपाखरुंचे संवर्धन तसंच त्यांच्या वेगवेगळ्या प्रजातीबाबद सामान्य नागरिकांना माहिती देणे त्यांच्यात जागृती करणे हा या फेस्टिव्हलचा उद्देश असतो.

First published:

Tags: Career, Exam, Local18