• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • Mumbai Job Alert: सामान्य प्रशासन विभाग मुंबई इथे नोकरीची संधी; तब्बल 2 लाखांपर्यंत मिळणार पगार

Mumbai Job Alert: सामान्य प्रशासन विभाग मुंबई इथे नोकरीची संधी; तब्बल 2 लाखांपर्यंत मिळणार पगार

पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

 • Share this:
  मुंबई, 31 ऑगस्ट:  सामान्य प्रशासन विभाग मुंबई (General Administration Department Mumbai) माननिय राज्यपालांच्या सचिव कार्यालयाच्या आस्थापनेवरील काही पदांसाठी लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिकृत सूचना (GAD Mumbai Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ स्वीय सहाय्यक, उच्चश्रेणी लघुलेखक आणि लघुटंकलेखक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती वरिष्ठ स्वीय सहाय्यक (Senior Self Assistant) उच्चश्रेणी लघुलेखक (High Class Short Stenographer ) लघुटंकलेखक (Shorthand Stenographer) पात्रता आणि अनुभव वरिष्ठ स्वीय सहाय्यक (Senior Self Assistant) - संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. उच्चश्रेणी लघुलेखक (High Class Short Stenographer ) - संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. लघुटंकलेखक (Shorthand Stenographer)  - संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. (अधिक माहितीसाठी जाहिरात बघावी.) या पत्त्यावर पाठवा अर्ज नोंदणी शाखा, सामान्य प्रशासन विभाग, पहिला मजला, मंत्रालय (अॅनेक्स बिल्डिंग), मुंबई- 400 032 / rts.mumcomm-mh@gov.in हे वाचा - तरुणांनो, नोकरी शोधताय? मग 'या' टॉप जॉब सर्चिंग अप्लिकेशन्स मोबाईलमध्ये आहेत ना? लगेच करा डाउनलोड इतका मिळणार पगार वरिष्ठ स्वीय सहाय्यक (Senior Self Assistant) - 67,700/- - 2,08,700/-  रुपये प्रतिमहिना उच्चश्रेणी लघुलेखक (High Class Short Stenographer ) - 41,800/- - 1,31,300/-  रुपये प्रतिमहिना लघुटंकलेखक (Shorthand Stenographer) - 25,500/- - 81,100/-  रुपये प्रतिमहिना अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 सप्टेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://maharashtra.gov.in/1125/Home  या लिंकवर क्लिक करा
  Published by:Atharva Mahankal
  First published: