मराठी बातम्या /बातम्या /करिअर /GATE 2023 Exam: एका झटक्यात परीक्षा क्रॅक करायची आहे ना? मग असं करा लास्ट मिनिट Preparation

GATE 2023 Exam: एका झटक्यात परीक्षा क्रॅक करायची आहे ना? मग असं करा लास्ट मिनिट Preparation

असं करा लास्ट मिनिट Preparation

असं करा लास्ट मिनिट Preparation

या परीक्षेत चांगलं यश मिळाल्यास विद्यार्थ्यांना प्रतिष्ठित आयआयटी, आयआयसी, एनआयटी, आयआयआयटी इत्यादी संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळते.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 02 फेब्रुवारी:  दी ग्रॅज्युएट अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग (गेट 2023) ही भारतातल्या अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी असलेल्या स्पर्धा परीक्षांपैकी सर्वांत आव्हानात्मक परीक्षा आहे. या परीक्षेत चांगलं यश मिळाल्यास विद्यार्थ्यांना प्रतिष्ठित आयआयटी, आयआयसी, एनआयटी, आयआयआयटी इत्यादी संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळते.

गेल्या काही वर्षांपासून, केवळ पदव्युत्तर अभ्याक्रमांच्या प्रवेशासाठीच नाही, तर सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांतल्या नोकरभरतीसाठीदेखील गेट परीक्षेचे गुण गृहीत धरले जात आहेत. याशिवाय, भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर (BARC), इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO), डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) आणि कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च (CSIR) इत्यादी प्रतिष्ठित संस्थांमध्ये संशोधन आणि करिअर करण्यासाठी गेट परीक्षेची मदत होत आहे.

GATE 2023: परीक्षेसाठी सेंटरवर जाण्याआधी या गाईडलाईन्स वाचल्यात ना? अन्यथा होऊ शकते गडबड

2023 या वर्षातली गेट परीक्षा काही दिवसांनी होणार आहे. या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फायद्याच्या ठरतील अशा काही टिप्स या ठिकाणी देण्यात आल्या आहेत. टीआयएमई संस्थेतले गेट परीक्षेचे शैक्षणिक प्रमुख मुरली कार्तिकेयन यांनी या टिप्स दिल्या आहेत.

अभ्यासक्रम माहिती करून घ्या : परीक्षेचा अभ्यासक्रम आणि पॅटर्न व्यवस्थित समजून घ्या. प्रत्येक विषयाचं वेटेज समजून त्यानुसार तयारी करा. प्रत्येक स्वतंत्र पेपरमध्ये असे विषय आणि प्रकरणं असतात ज्यांना इतरांच्या तुलनेत अधिक महत्त्व असतं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तयारी करताना अगोदर या विषयांवर लक्ष केंद्रित केल्यास फायदा होईल.

Competitive Exams: MPSC असो वा NEET कोणतीही स्पर्धा परीक्षा एका झटक्यात होईल क्रॅक; अशी करा स्मार्ट स्टडी

मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करा : मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवल्यानं तुम्हाला परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांच्या प्रकाराची कल्पना येईल. या सरावातून तुम्हाला तुमच्या तयारीतल्या चांगल्या आणि कमकुवत जागा ओळखता येतील. याव्यतिरिक्त, यामुळे तुमची वेळेची व्यवस्थापन कौशल्यं सुधारण्यास मदत होईल.

कमकुवत विषयांवर लक्ष केंद्रित करा : तुम्ही ज्या विषयात कमकुवत आहात ते विषय किंवा प्रकरण ओळखा आणि त्याकडे जास्त लक्ष द्या. त्याचा मूळ गाभा पूर्णपणे समजून घेतल्याची खात्री करा. कमकुवत विषय किंवा प्रकरण तुम्ही हातानं तयार केलेली फॉर्म्युला शीट किंवा रेफरन्स टेबल शीट इत्यादी वापरून कव्हर केले जाऊ शकतात.

स्टडी मटेरिअलचा हुशारीनं वापर करा : आपल्याकडे उपलब्ध असलेल्या स्टडी मटेरिअलचा हुशारीनं वापर करा. सेमिस्टर परीक्षेच्या पुस्तकांऐवजी नेहमी गेट परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयार केलेल्या स्टडी मटेरिअलचा वापर करा. कारण, वर्णनात्मक स्वरूपातली सेमिस्टर परीक्षा आणि वस्तुनिष्ठ स्वरूपातल्या 'गेट'सारख्या परीक्षा देण्यासाठी भिन्न स्टडी मटेरिअल आणि भिन्न दृष्टिकोन आवश्यक असतो.

Work From Home सोडून रोज टाईमपास करत होती महिला; एका सॉफ्टवेअरनं केली पोलखोल

संख्यात्मक प्रश्नाचा सराव करा : परीक्षेत संख्यात्मक प्रश्न मोठ्या प्रमाणात असतात. ते सोडवताना तुमचा वेग आणि अचूकता वाढवण्यासाठी तुम्ही पुरेसा सराव केला पाहिजे. याचा फायदा असा आहे की त्यांना परीक्षेत नकारात्मक गुण मिळत नाहीत आणि तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग कमी मिळतं.

वेळेचं व्यवस्थापन : परीक्षेत वेळेचं व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचं असतं. तुम्ही प्रत्येक प्रश्नासाठी पुरेसा वेळ दिला आहे याची खात्री करा. एकाच प्रश्नावर जास्त वेळ अडकून राहू नका. मॉक टेस्टचा सराव करून वेळेचं व्यवस्थापन करता येऊ शकतं.

परीक्षेवर लक्ष केंद्रित करावं आणि विचलित होणं टाळलं पाहिजे. अभ्यासासाठी अनुकूल वातावरण तयार करा आणि सोशल मीडिया, टीव्ही यांसारख्या विचलित करणाऱ्या बाबी टाळा. पौष्टिक अन्न खाऊन, नियमित व्यायाम करून आणि पुरेशी झोप घेऊन जीवनशैली निरोगी राखा. निरोगी शरीर आणि मन तुम्हाला परीक्षेत चांगली कामगिरी करण्यास मदत करेल. सकारात्मकता आणि आत्मविश्वासानं परीक्षेला सामोरं जा. स्वतःवर आणि आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा. तुम्हाला अडचणी आल्यास निराश होऊ नका. स्वतःला प्रोत्साहन देत राहा. असं केल्यास तुम्ही यशस्वी व्हाल.

First published:

Tags: Career, Career opportunities, Entrance Exams, Examination