मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

इंजिनिअर्स, GATE 2023 परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केलंत ना? अवघे काही दिवस शिल्ल्क; लगेच करा नोंदणी

इंजिनिअर्स, GATE 2023 परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केलंत ना? अवघे काही दिवस शिल्ल्क; लगेच करा नोंदणी

उद्या शेवटची तारीख

उद्या शेवटची तारीख

आता GATE परीक्षेसाठी रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 असणार आहे. यासाठी रजिस्ट्रेशन नक्की कसं करावं? आणि रजिस्ट्रेशनसाठी नक्की कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत हे जाणून घेऊया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 26 सप्टेंबर: देशातील इंजिनिअर्ससाठी सर्वात मोठी बातमी समोर येते आहे. इंजिनिअरिंग नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा गव्हर्नमेंट जॉबसाठी होणाऱ्या GATE परीक्षेचं वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. GATE 2023 साठी हे वेळापत्रक (GATE 2023 Exam Schedule) जारी करण्यात आलं आहे. दरवर्षी ही परीक्षा इंजिनिअरिंगच्या विविध ब्रांचेससाठी घेण्यात येते. Mtech किंवा इतर पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स करण्यासाठी किंवा PSU मध्ये नोकरी करण्यासाठी ही प्रवेश प्रक्रिया असते. आता GATE परीक्षेसाठी रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 असणार आहे. यासाठी रजिस्ट्रेशन नक्की कसं करावं? आणि रजिस्ट्रेशनसाठी नक्की कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत हे जाणून घेऊया.

SSC CGL 2022 भरती प्रक्रियेत मोठे बदल; अर्ज करण्यापूर्वी महत्वाच्या गोष्टी वाचाच

रजिस्ट्रेशनसाठी ही कागदपत्रं आवश्यक

उमेदवाराच्या छायाचित्राची आणि स्वाक्षरीची स्कॅन केलेली प्रत

वैध फोटो आयडी – आधार कार्ड/पासपोर्ट/ड्रायव्हिंग लायसन्स/पॅन कार्ड/मतदार आयडी/कॉलेज आयडी

परदेशातील अर्जदारांसाठी पासपोर्ट/सरकार. जारी केलेला आयडी/कॉलेज आयडी/कर्मचारी आयडी त्यांचा वैध आयडी पुरावा म्हणून काम करेल

पदवी/ तात्पुरती/ अभ्यासक्रम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र

5व्या/6व्या/7व्या सेमिस्टरच्या मार्कशीटचे प्रिंटआउट्स

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी होम ऑफ इन्स्टिट्यूट/डीन/रजिस्ट्रार/विभाग प्रमुख यांनी सामायिक केलेल्या फॉरमॅटनुसार तात्पुरते प्रमाणपत्र पत्र सादर करणे आवश्यक आहे.

महिन्याचा 34,000 पगार आणि बऱ्याच सुविधा; 'या' नॅशनल बँकेत नोकरीची मोठी संधी; लगेच करा अर्ज

जातीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)

अपंगत्व किंवा PwD प्रमाणपत्र (लागू असल्यास)

सध्या उच्च पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना पात्रता पदवीचे प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल.

असं करा रजिस्ट्रेशन

gate.iitk.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या .

मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या “GATE 2023 Registration” या लिंकवर क्लिक करा.

पोर्टलवर स्वतःची नोंदणी करा.

एकदा नोंदणीकृत झाल्यावर, सिस्टम-व्युत्पन्न आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.

GATE 2023 अर्ज भरा.

आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

तब्बल 88,000 पगाराच्या जॉबसाठी अर्ज केलात ना? अवघे काही दिवस शिल्लक

उमेदवारांनी अर्ज फी भरणे आवश्यक आहे.

एकदा तुम्ही अर्जाची फी भरली की, फॉर्म सबमिट करा.

GATE 2023 अर्ज डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआउट घ्या.

First published:

Tags: Career, Career opportunities, Entrance Exams, Job, Job alert, Jobs Exams