GATE 2021 : गेट परीक्षा अर्जात बदल करण्याची शेवटची संधी; IIT ने सुरू केली विंडो

GATE 2021 : गेट परीक्षा अर्जात बदल करण्याची शेवटची संधी; IIT ने सुरू केली विंडो

GATE Online Application Procession System (GOAPS) या अधिकृत पोर्टलनं ऑनलाइन विंडो ओपन केली असून, विद्यार्थ्यांना 15 डिसेंबरपर्यंत हे बदल करता येणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 15 डिसेंबर : इंजिनीअरिंगच्या प्रवेशासाठी (Engineering admission) अत्यावश्यक असणाऱ्या गेट (GATE 2021) परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्जात आधी नमूद केलेलं परीक्षा केंद्र बदलायचं असेल तर तशी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.  GATE Online Application Procession System (GOAPS) या अधिकृत पोर्टलनं ऑनलाइन विंडो ओपन केली असून, विद्यार्थ्यांना 15 डिसेंबरपर्यंत हे बदल करता येणार आहेत. त्यासाठी त्यांना gate.iitb.ac.in या वेबसाईटवर जाऊन अर्जात बदल करता येतील. आयआयटी, मुंबई (Indian Institute of Technology (IIT) Bombay) या परीक्षेचं संयोजन करत असून, विद्यार्थ्यांना अर्जात काही सुधारणा करायच्या असतील तर ही शेवटची संधी असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. वेबसाईटच्या होमपेजवर याबाबतची सूचना देण्यात आली आहे. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना 15 डिसेंबर ही अर्जात सुधारणा करण्यासाठी शेवटची संधी आहे. त्यासाठी कोणतेही शुल्क नाही.

गेट (GATE 2021 committee) परीक्षा समितीकडे नोंदणी केलेल्या अनेक विद्यार्थ्यांकडून त्यांना परीक्षेचे ठिकाण बदलण्याची शेवटची संधी द्यावी अशी विनंती करण्यात आली होती. सध्याची कोरोना महासाथीची परिस्थिती आणि विद्यार्थांची विनंती याचा विचार करून विंडो ओपन करण्यात आली असल्याचं समितीनं म्हटलं आहे. 14 डिसेंबर रोजी ही विंडो ओपन करण्यात आली असून ती एक दिवसच खुली राहणार आहे. परीक्षा केंद्र निश्चित करणं, विद्यार्थी क्रमांकानुसार त्यांचं वाटप करणं आणि त्यानुसार प्रवेशपत्र पाठवणं यासाठी पुरेसा वेळ आवश्यक असल्यानं ही विंडो एकच दिवस खुली ठेवण्यात येणार असल्याचं समितीनं स्पष्ट केलं आहे.

पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात ही परीक्षा होणार आहे. इंजिनीअरिंग, टेक्नॉलॉजी, आर्किटेक्चर आणि कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील काही पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी गेट (GATE) परीक्षा घेतली जाते. आयआयटी, मुंबई (IIT Mumbai)या परीक्षांचे संयोजन करते.

Published by: News18 Desk
First published: December 15, 2020, 4:06 PM IST

ताज्या बातम्या