नागपूर, 11 ऑगस्ट: नागपूर वनविभागात (Forest Department, MahaForest Nagpur) विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय पर्यवेक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer)
पशुवैद्यकीय पर्यवेक्षक (Veterinary Supervisor)
शैक्षणिक पात्रता
पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) - M.V.Sc मास्टर ऑफ व्हेटर्नरी सायन्स
पशुवैद्यकीय पर्यवेक्षक (Veterinary Supervisor) - पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक.
हे वाचा - सुवर्णसंधी! Coal इंडियामध्ये तब्बल 588 जागांसाठी होणार मेगाभरती; या जागा रिक्त
या पत्त्यावर पाठवा अर्ज
उपवनसंरक्षक, नागपूर वनविभाग, नागपूर तळमजला, (बी.एस.एन.एल. बिल्डींग) श्री. मोहीनी कॉमप्लेक्स जवळ, कस्तुरचंद पार्क, नागपूर – 440001.
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Jobs