Online Job Interview द्यायचाय? जरा थांबा, आधी हे वाचा; जॉब तुम्हालाच मिळणार

आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स (Tips for Online Job Interview) सांगणार आहोत.

आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स (Tips for Online Job Interview) सांगणार आहोत.

  • Share this:
    मुंबई, 18 जून :  Online Job Interview म्हंटलं की भल्या भल्यांना घाम सुटतो. प्रत्यक्ष मुलाखतीदरम्यान लोक इतके घाबरत नसतील जेवढे Online Job Interview ला घाबरतात. याचं प्रमुख कारण म्हणजे नसलेली सवय आणि आत्मविश्वास (Self Confidence) . तसंच ऑनलाइन मुलाखतीदरम्यान कुठल्या अडचणी तर येणार नाहीत ना याबद्दल साशंकता. मग Online Job Interview द्यायचा तरी कसा? चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स (Tips for Online Job Interview) सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही आणि तुमचा आत्मविश्वासही वाढण्यास मदत होईल. चला तर मग जाणून घेऊया. पूर्वतयारी करून ठेवा एखाद्या व्हिडिओ मुलाखतीत इतकी तयारी ठेवणं महत्वाचं आहे की जणू आपण वैयक्तिकरित्या मुलाखत देत आहोत. आपण कंपनीचे उद्योग, उत्पादनं आणि कामाचं स्वरूप याबद्दल संपूर्ण संशोधन आवश्यक आहे, जेणेकरून आपण आपल्या मुलाखत दरम्यान त्याबद्दल चर्चा करण्यास अवघड जाणार नाही. तसंच कंपनीबाबत गुगल सर्च करून ठेवा. जर मुलाखतीदरम्यान तुम्हाला याबाबत प्रश्न विचारला तर तुम्ही आत्मविश्वासानं उत्तर देऊ शकाल. वेळेचं भान ठेवा जर कंपनी तुम्ही कधीही न वापरलेलं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सॉफ्टवेअर वापरत असेल तर प्रोग्राम डाउनलोड करण्यासाठी किंवा आपल्या ब्राउझरमध्ये तो उघडण्यास थोडा वेळ लागू शकतो. म्हणूनच वेळेचं भान ठेवा. मुलाखतीच्या साधारणतः दहा मिनिटांआधी संपूर्ण तयारी करून ठेवा. ऐनवेळी अडचण आली तर तुम्हाला हे दहा मिनिटं कमी येतील. तसंच मुलाखतीच्या वेळेच्या आधी जॉईन करा. यामुळे तुम्ही वेळेचे पक्के आहेत हे दिसून येईल. इंटरनेट कनेक्शन तपासून घ्या मुलाखत सुरु होण्याच्या किमान अर्धा तास आधी तुमच्या लॅपटॉपचं किंवा मोबाईलचं इंटरनेट कनेक्शन तपासून घ्या. मोबाईलचा हॉटस्पॉट वापरण्याऐवजी वायफाय असल्यास त्याचा उपयोग करा. तसंच तुमचे इयरफोन्स आणि कॅमेराही तपासून घ्या. इयरफोन्समधून आवाज स्पष्ट येतोय याची खात्री करून घ्या. तसंच कॅमेरामध्ये सावली तर येत नाही ना किंवा अंधार तर येत नाही ना याचीही खात्री करा. लक्षात ठेवा एक चूक तुमचा जॉब हिरावून घेऊ शकते म्हणून सर्व गोष्टी नीट तपासून घ्या. हे वाचा - नोकरी करताना शिक्षण सुरु ठेवायचंय? या आहेत टॉप डिस्टन्स लर्निंग युनिव्हर्सिटीज घरातील वातावरण शांत असू द्या अनेकदा ऑनलाइन मुलाखत सुरु असताना घरातील व्यक्तींचे किंवा घराबाहेरील लोकांचे अनेक आवाज मुलाखतीत व्यत्यय आणत असतात यामुळे मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला तुमचं बोलणं ऐकण्यास त्रास होतो आणि तुमचं इम्प्रेशन खराब होऊ शकतं. त्यामुळे मुलाखतीदरम्यान घरात शांतता असेल याची खात्री करून घ्या. स्वच्छ कपडे घाला ऑनलाइन मुलाखतीदरम्यान आंकडा आपल्या कंबरेच्या खालचा भाग दिसून येत नाही. आपण फक्त वर वर कपडे स्वच्छ घालतो. मात्र मुलाखत ऑनलाइन जरी असली तरी संपूर्ण ड्रेसिंग स्वच्छ ठेवा. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. मोठ्या आवाजात आणि स्पष्ट बोला अनेकदा ऑनलाइन मुलाखतीदरम्यान तुमचा आवाज समोरच्या व्यक्तींपर्यंत कमी जातो. यासाठी नेहमी थोड्या मोठ्या आवाजात आणि स्पष्ट बोला. बोलताना तुमची थुंकी उडणार नाही याचंही भान असू द्या. तसंच गरजेपेक्षा मोठ्या आवाजात बोलू नका.
    Published by:Atharva Mahankal
    First published: