मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

"MPSC परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आता वेळापत्रक पाळा म्हणजे झालं"; सोशल मीडियावर उमेदवारांची मागणी

"MPSC परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आता वेळापत्रक पाळा म्हणजे झालं"; सोशल मीडियावर उमेदवारांची मागणी

 महाराष्ट्र लोकसेवा आयोग

महाराष्ट्र लोकसेवा आयोग

MPSC परीक्षांचं वेळापत्रक जाहीर (MPSC Exam Time Table) करण्यात आलं आहे. मात्र सोशल मीडियावर MPSC ला या मुद्द्यावरून ट्रोल करत आहेत.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 04 डिसेंबर: महाराष्ट्र राज्यसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) म्हणजेच MPSC मध्ये नोकरी (Maharashtra MPSC jobs) मिळवणं म्हणजे राज्यातील तरुण-तरुणींसाठी प्रतिष्ठेची बाब आहे. UPSC प्रमाणेच राज्यातील तळागाळातील उमेदवार हे MPSC ची तयारी करत असतात. जागांच्या आवश्यकतेनुसार MPSC परीक्षा (MPSC Exam 2021) घेतली जाते आणि नियुक्तीही केली जाते. मात्र कोरोनामुळे MPSC परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांचे बरेच हाल झाले. कोरोना लॉकडाऊनमुळे परीक्षा आणि निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या पुढे ढकलण्यात आल्या. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे आता MPSC नं पहिल्यांदाच UPSC प्रमाणे पुढील वर्षासाठीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर (MPSC Exam Time Table) करण्यात आलं आहे. मात्र सोशल मीडियावर MPSC ला या मुद्द्यावरून ट्रोल (MPSC Exam time table) करत आहेत.

काही महिन्यांपूर्वी पुण्यातील स्वप्नील लोणकर या MPSC च्या उमेदवाराने आत्महत्या केल्यानंतर MPSC च्या उमेदवारांच्या नियुक्त्यांचा आणि परीक्षांचा मुद्दा चांगलाच गाजला होता. त्यात राजकारणहे सुरु झालं होतं. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे MPSC च्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे MPSC चे उमेदवार त्रस्त झाले होते.

मोठी बातमी! MPSC उमेदवारांची प्रतीक्षा अखेर संपली; परीक्षांच्या तारखा जाहीर

2019 मध्ये घेण्यात आलेल्या MPSC चा परीक्षांचा निकाल लावण्यात आल्यानंतर मुलाखती (MPSC Interview) झाल्या निवडही झाली मात्र निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अजूनही नियुक्ती देण्यात आली नव्हती. यावर विद्यार्थी नाराज होते. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी नियुक्त्या लवकरच करण्यात येतील असं आश्वासन दिलं होतं.

MPSC नं जारी केला टाईमटेबल

आता UPSC प्रमाणेच MPSCनं ही पहिल्यांदाच पुढील वर्षांसाठीच्या MPSC च्या परीक्षांचा टाइम टेबल जारी (MPSC Exam time table 2022) केला आहे. पुढील वर्षीच्या पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा कधी घेण्यात येतील आणि निकाल कधी लागणार हे जाहीर करण्यात आलं आहे. मात्र आता यावरून नेटकरी आणि उमेदवार MPSC ला ट्रोल (MPSC students on Social media) करत आहेत.

MPSC Guide: उमेदवारांनो, घरबसल्याच होऊ शकतो MPSC परीक्षेचा उत्तम अभ्यास; केवळ अशा पद्धतीनं करा तयारी

काय म्हणताहेत उमेदवार

" महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पर्धा परीक्षेचा अंदाजित वेळापत्रक जाहीर केल्या बदल मी सर्व स्पर्धा परीक्षा देण्याऱ्या विद्यार्थ्यांकडून आपले खूप आभार मानतो . त्याच बरोबर CDPO हे पद सरळ सेवेनेच भरण्यात यावे अशी विनंती करतो." अशी मागणी ट्विटरवर एका उमेदवारानं केली आहे.

परीक्षेत चुका टाळा 

"येणाऱ्या सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिकेत कमीम कमी चूका होतील जेणे करून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही एवढी काळजी मा.आयोगाने घ्यावी" अशीही मागणी एका उमेदवाराने ट्विटरवर केली आहे.

कधी होणार MPSC परीक्षा

महाराष्ट्र राज्यसेवा पूर्व परीक्षा (MPSC Exam dates 2022) 2 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. या परीक्षेचा निकाल मार्च महिन्यापर्यंत जाहीर करण्यात येणार आहे. तर मुख्य परीक्षा 7,8 आणि 9 मे रोजी होणार आहे. या परीक्षेचा निकाल ऑगस्ट 2022 मध्ये जाहीर होणार आहे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेचा भाग असलेली पूर्व परीक्षा 12 मार्च 2022 रोजी होणार आहे. मुख्य परीक्षा 2 जुलै 2022 रोजी होईल तर निकाल ऑगस्टमध्ये जाहीर होणार आहे.

First published:

Tags: Career, Mpsc examination, महाराष्ट्र