Home /News /career /

Job Alert: महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसाय विभागात नोकरीची संधी; 'या' पदासाठी आताच पाठवा अर्ज

Job Alert: महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसाय विभागात नोकरीची संधी; 'या' पदासाठी आताच पाठवा अर्ज

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2021 असणार आहे.

    मुंबई, 28 जुलै: महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग मुंबई (Fisheries Department Maharashtra) इथे लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मराठी / हिंदी / इंग्रजी भाषा अनुवादक (Language Translator) या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदासाठी भरती मराठी / हिंदी / इंग्रजी भाषा अनुवादक (Language Translator) शैक्षणिक पात्रता मराठी / हिंदी / इंग्रजी भाषा अनुवादक (Language Translator) - कला शाखेतून मराठी आणि इंग्रजी विषयातून पदवी आवश्यक. तसंच दिलेल्या तीनही भाषांवर प्रभुत्व आवश्यक. पत्रव्यवहाराचा अनुभव आवश्यक. हे वाचा -  Indian Navy Recruitment: संगीत शिकणाऱ्यांसाठी नौदलात सर्वात मोठी संधी इतका मिळणार पगार मराठी / हिंदी / इंग्रजी भाषा अनुवादक (Language Translator) - 25,000/- रुपये प्रतिमहिना अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 ऑगस्ट 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा. 
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs, Mumbai

    पुढील बातम्या