नवी दिल्ली, 30 मे : केवळ 11 वर्षांपूर्वी सुरू केलेली फिनटेक कंपनी जेरोधाचे (Zerodha) को-फाउंडर नितिन कामथ आणि निखिल कामथ (Nikhil and Nithin kamath) यांच्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. या दोन फाउंडर्सला आता 100-100 कोटी रुपये वार्षिक सॅलरी मिळणार असल्याचं बोललं जात आहे. Zerodha प्रामुख्याने शेअर ब्रोकिंग क्षेत्रात काम करते. ही कंपनी लोकांना अॅपद्वारे शेअर बाजारात ट्रेडिंग करण्याची सुविधा देते.
Entrackr नुसार, बोर्डने या दोन्ही भावांना 100-100 कोटी सॅलरी देण्यासाठी विशेष प्रस्ताव मांडला आहे. एवढंच नाही, तर नितिन कामथ यांच्या पत्नी सीमा पाटील यांची नुकतीच Zerodha मध्ये संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनादेखील मोठी सॅलरी देण्यात येणार आहे. त्याशिवाय माधव कोटा सुब्रमण्यम यांनाही 5 वर्षासाठी संचालक म्हणून नियुक्त करण्यात आलं असून 2 कोटी रुपये इतकी त्यांची वार्षिक सॅलरी असेल.
बेसिक सॅलरी 4.17 कोटी -
निखिल, नितिन आणि सीमा यांना दर महिन्याला मिळणारी बेसिक सॅलरी 4.17 कोटी रुपये असेल, परंतु यात अनेक प्रकारचे खर्च-भत्ते जोडल्यानंतर, त्यांची वार्षिक सॅलरी 100 कोटींपर्यंत पोहोचते. अशाप्रकारे या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 300 कोटी रुपये होईल.
Zerodha ची स्थापना 2010 मध्ये झाली होती. कंपनीच्या स्थापनेपासूनच कंपनीची सतत ग्रोथ होत आहे. स्थापनेच्या केवळ 10 वर्षातच या कंपनीचं उत्पन्न 1000 कोटी रुपये आणि प्रॉफिट 442 कोटी रुपयांवर पोहचला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.