'...तर विद्यार्थ्यांना Question Bank मिळणार', अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत मोठा निर्णय

'...तर विद्यार्थ्यांना Question Bank मिळणार', अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत मोठा निर्णय

विद्यार्थ्यांना घराबाहेर न पडता परीक्षा घ्यायची यावर सर्व कुलगुरूंचं एकमत झालं आणि त्यासाठी MCQ पद्धतीनं परीक्षा घेण्यासंदर्भात चर्चा झाली.

  • Share this:

मुंबई, 10 सप्टेंबर : कोरोनामुळे अंतिम वर्षांच्या परीक्षा रखडल्या होत्या. अंतिम वर्षांचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिल्यानंतर आता या परीक्षा रद्द न होणार नाहीत तर राज्यांना त्यांच्या सोयीच्या तारखांनुसार घेता येणार आहेत. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन परीक्षा घरातून कशी देता येईल यासाठी मुंबई विद्यापीठात चर्चा सुरू होती.

विद्यार्थ्यांना घराबाहेर न पडता परीक्षा घ्यायची यावर सर्व कुलगुरूंचं एकमत झालं आणि त्यासाठी MCQ पद्धतीनं परीक्षा घेण्यासंदर्भात चर्चा झाली. विद्यार्थ्यांना MCQ पेपरचा पॅटर्न लक्षात यावा यासाठी परीक्षेपूर्वी Question Bank देण्यात येणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

यासंदर्भात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्यासोबत चर्चा झाली असून परीक्षेआधी विद्यार्थ्यांना सरावासाठी Question Bank देण्यात येईल अशी माहिती ट्वीट करून उदय सामंत यांनी दिली आहे.

हे वाचा-पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे बदललं नशीब; इंजिनिअर महिन्याला कमावतोय लाखो रुपये

31 ऑगस्ट रोजी यासंदर्भात महत्त्वाची बैठक झाली होती. राज्यातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन घरातून परीक्षा घेण्यासंदर्भात काम सुरू आहे. राज्यातल्या 7 लाख 92 हजार 385 विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची आहे.

विद्यार्थ्यांना घराबाहेर पडून केंद्रांवर परीक्षा द्यायला जावं लागू नये यासाठी सुरक्षित आणि सोपा पर्याय निवडत आहोत, असं उच्च शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाने अंतिम परीक्षा घेतल्याखेरीज पदवी देऊ नये, असा निर्णय दिल्यामुळे अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहेत.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 10, 2020, 12:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading