मॉडेल ते UPSC! मिस इंडिया फायनलिस्ट ऐश्वर्यानं पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली परीक्षा

मॉडेल ते UPSC! मिस इंडिया फायनलिस्ट ऐश्वर्यानं पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली परीक्षा

ऐश्वर्याने या परीक्षेत 93वा रॅंक मिळवला आहे. मुख्य म्हणजे ऐश्वर्या फक्त UPSCमधील यशस्वी उमेदवारांच्या यादीतच नाही तर ती मिस इंडिया फायनलिस्टही (Femina Miss India) होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 ऑगस्ट : केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) सेवा परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला. UPSC civil Service साठी झालेल्या या परीक्षेत देशभरातून 829 महत्त्वाकांक्षी युवक युवती निवडले गेले आहेत. यात परीक्षेत हरियाणाचा प्रदीप सिंह देशात पहिला आला. मात्र या सगळ्यात एक नाव चर्चेत आहे ते म्हणते ऐश्वर्या शिवराण (Aishwarya Sheoran). ऐश्वर्याने या परीक्षेत 93वा रॅंक मिळवला आहे. मुख्य म्हणजे ऐश्वर्या फक्त UPSCमधील यशस्वी उमेदवारांच्या यादीतच नाही तर ती मिस इंडिया फायनलिस्टही (Femina Miss India) होती.

टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्याने सांगितले की, तिच्या आईने ऐश्वर्या रायच्या नावावरून तिचे नाव ठेवले होते. कारण आईची इच्छा होती ती ऐश्वर्यानेही मिस इंडिया व्हावे. त्यानंतर मिस इंडियाच्या 21 फायनलिस्टमध्ये तिची निवड झाली. मात्र ऐश्वर्याचे स्वप्न हे सिव्हिल सर्व्हिसमध्ये काम करायचेच होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ऐश्वर्याने मॉडेलिंग कारकीर्दीतून ब्रेक घेतला आणि सिव्हिल सर्व्हिस परीक्षेची तयारी सुरू केली आणि आता त्यात य़शस्वीसुद्धा यशस्वी झाली.

वाचा-ASI ची मुलगी झाली IAS; देशात 6 व्या क्रमांकावर येऊन पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न

कोणत्याही क्लासेस शिवाय केला अभ्यास

ऐश्वर्याने सांगितले की, मी सुरुवातीपासूनच अभ्यासात चांगली होते. म्हणूनच या परीक्षेसाठी मी कोचिंग क्लासेस शिवाय अभ्यास केला. अभ्यासासाठी वेळेची नियोजना कशी करायची यावर ऐश्वर्याने, “मी माझा फोन बंद केला आणि मी सोशल मीडियापासून दूर होते. जेणेकरून मी परीक्षेवर लक्ष केंद्रित करू शकेन. असे नव्हते की मी अचानक अभ्यासाला सुरुवात केली, मला नेहमीच अभ्यासाची आवड होती”. ऐश्वर्यानं 93वा रॅंक मिळवला असून, आता तिची पोस्टिंगची वाट पाहत आहे.

वाचा-अंधत्वावर मात करत पुण्याचा जयंत मंकले UPSC मध्ये देशात 143वा

वडील आहेत कमांडिंग ऑफिसर

ऐश्वर्याने दिलेल्या माहितीनुसार, ती विज्ञान शाखेची विद्यार्थिनी होती. नंतर तिने श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये प्रवेश घेतला. ऐश्वर्याचे वडील कर्नल अजय कुमार एनसीसी तेलंगाना बटालियनचे कमांडिंग ऑफिसर आहेत. ऐश्वर्याच्या मते सैन्यात महिलांना संधी दिली जाते, परंतु अजूनही मर्यादित संख्येने आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: August 5, 2020, 12:31 PM IST

ताज्या बातम्या