Home /News /career /

मातीतलं सोनं : रेशीम शेतीतून मिळवा भरघोस उत्पादन, सबसिडीसह सरकारकडून मिळेल पूर्ण मार्गदर्शन

मातीतलं सोनं : रेशीम शेतीतून मिळवा भरघोस उत्पादन, सबसिडीसह सरकारकडून मिळेल पूर्ण मार्गदर्शन

कच्चे रेशीम बनवण्यासाठी रेशीम किड्यांच्या संगोपनाला रेशीम किंवा रेशीम शेती म्हणतात. रेशीम उत्पादनाच्या बाबतीत भारत चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. सर्व प्रकारचे रेशीम येथे घेतले जातात.

    नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर : आजकाल शेती एक उद्योग म्हणून उदयास येत आहे. प्रत्यक्षात मातीत सोनं आहे आणि ते मिळवण्यासाठी हुशारीनं शेती करणाऱ्यांची गरज आहे. शेतीत आता फक्त पारंपरिक पिकांव्यतिरिक्त इतर आधुनिक उत्पादने (Advance Farming) घेतली जातात. तसेच शेतीला पूरक उद्योग म्हणून पशुपालन, मत्स्यपालन, दुग्ध प्रक्रिया प्रकल्प, दुग्ध उद्योगासह अनेक व्यवसाय आहेत, ज्यातून आज शेतकरी चांगले उत्पन्न घेत आहेत. शेतीतून मिळणारे उत्पन्न पाहता अनेक तरूण आपली ठोस पगाराची नोकरी सोडून शेताकडे वळत आहेत. शेतीशी संबंधित आणखीन एक असे एक काम आहे, जे चांगले पैसे मिळवून देऊ शकते. शेतीशी संबंधित कामांपैकी एक म्हणजे रेशीम किड्यांचे संगोपन (Silk production Business). कच्चे रेशीम बनवण्यासाठी रेशीम किड्यांच्या संगोपनाला रेशीम किंवा रेशीम शेती म्हणतात. रेशीम उत्पादनाच्या बाबतीत भारत चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. सर्व प्रकारचे रेशीम येथे घेतले जातात. भारतात 60 लाखांहून अधिक लोक विविध प्रकारच्या रेशीम कीटकांच्या संगोपनात गुंतलेले आहेत. भारतातील केंद्रीय रेशीम संशोधन केंद्राची स्थापना 1943 साली बहारामपूर येथे झाली. यानंतर, रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी रेशीम मंडळाची स्थापना 1949 मध्ये झाली. मेघालयात सेंट्रल एरी रिसर्च इन्स्टिट्यूट आणि रांचीमध्ये सेंट्रल तुसार रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची स्थापना झाली. भारत सरकार रेशीम किड्यांच्या संगोपनासाठी प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य देण्याचे काम करते. या व्यतिरिक्त, सरकार रेशीम कीटक संगोपन, रेशीम किड्यांची अंडी, कीटकांपासून तयार केलेल्या कोकोसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उपकरणे पुरवण्यास मदत करते. भारतात तीन प्रकारची रेशीम शेती आहे - तुती शेती, तुसार शेती आणि एरी शेती. रेशीम हे कीटकांच्या प्रथिनांपासून बनवलेला धागा असतो. तुती, अर्जुनाच्या पानांना खाणाऱ्या कीटकांच्या अळ्यांपासून उत्तम रेशीम तयार केली जाते. तुतीची पाने खाऊन कीटकांनी निर्माण केलेल्या रेशीमाला मलमल रेशीम म्हणतात. हे वाचा - या झाडाला मिळतंय 24 तास संरक्षण, एक पानही गळलं तरी प्रशासनात उडते खळबळ; पाहा PHOTOs कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, जम्मू-काश्मीर आणि पश्चिम बंगाल येथे तुती रेशीम तयार होते. तुती नसलेले रेशीम झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये तयार होते. केंद्रासह प्रत्येक राज्य सरकार स्वतःच्या स्तरावर शेतकऱ्यांसाठी रेशीम योजना तयार करते. ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या एक एकर जमिनीत तुती लागवड आणि रेशीम कीटक पालन करायचे आहे, त्यांना सरकार सर्व प्रकारची मदत देत आहे. रेशीम कीटकांच्या संगोपनाविषयी अधिक माहिती भारत सरकारच्या https://www.india.gov.in/en/topics/ag Agriculture/sericulture या वेबसाईटच्या लिंकवरून मिळू शकते. याशिवाय मध्य प्रदेश सरकार शेतकऱ्यांना रेशीम शेतीसाठी कर्ज देत आहे. यासंबंधी अधिक माहिती www.eresham.mp.gov.in या वेबसाईटवरून मिळू शकते. हे वाचा - PM Kisan Mandhan Yojana: शेतकऱ्यांना आयुष्यभर मिळेल 3000 रुपये पेन्शन, वाचा किती द्यावा लागेल प्रीमियम सेरीकल्चरमध्ये करिअर करण्यासाठी, पदवी-डिप्लोमा इत्यादी अभ्यासक्रम संबंधित महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये आयोजित केले जातात. रेशीम शेतीशी संबंधित अभ्यासासाठी, आपण या संस्थांशी संपर्क साधू शकता- केंद्रीय रेशीम संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, म्हैसूर केंद्रीय रेशीम संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, बेरहमपूर सॅम हिग्नेबॉटम इंस्टिट्यूट ऑफ अॅग्रीकल्चर, टेक्नॉलॉजी अँड सायन्सेस ओडिशा कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ, भुवनेश्वर शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठ, जम्मू इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, नवीन केंद्रीय रेशीम संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पंपूर, जम्मू आणि काश्मीर
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Agriculture

    पुढील बातम्या