• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • Facebook आता शिक्षण क्षेत्रातही! भारतीय विद्यार्थ्यांसाठी लाँच केला नवा उपक्रम

Facebook आता शिक्षण क्षेत्रातही! भारतीय विद्यार्थ्यांसाठी लाँच केला नवा उपक्रम

Facebook feature

Facebook feature

Facebook India ने देशातल्या लॉ स्टुडंट्ससाठी एक नवा कार्यक्रम लाँच केला आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 5 मे: फेसबुक इंडियाने (Facebook India) लॉ स्टुडंट्साठी एक प्रोग्राम लाँच केलाय. देशातील आघाडीच्या लॉ स्कूलमधील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान कायदा आणि धोरणाशी (Technology Law and Policy) संबंधित विषयांवर संशोधन करण्यासाठी आणि मार्गदर्शनासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी हा नवीन उपक्रम सुरू केल्याचं फेसबुक इंडियानं शुक्रवारी सांगितलंय. फेसबुक इंडिया टेक स्कॉलर्स (The Facebook India Tech Scholars) असं या उपक्रमाचं नाव असून त्यात शार्दुल अमरचंद मंगलदास अँड कंपनी (Shardul Amarchand Mangaldas & Co) हे नॉलेज पार्टनर आहेत. या कार्यक्रमाचे उद्दीष्ट देशातील निवडक आघाडीच्या लॉ स्कूलमधील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान कायदा आणि धोरणाशी संबंधित विषयांवर संशोधन आणि मार्गदर्शनासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे आहे. एफआयटीएस कार्यक्रमाच्या पहिल्या बॅचमध्ये लॉच्या आठ विद्यार्थ्यांना संशोधन प्रकल्पात (research project) काम करण्याची संधी देण्यात येणार आहे. तसेच भारतातील अग्रगण्य थिंक टँक या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील, असंही फेसबुक इंडियाने सांगितलं. तंत्रज्ञानाशी संबंधित कायद्याच्या क्षेत्रातील नवीन आव्हानांचा अभ्यास करता यावा, यासाठी या उपक्रमात सहभागी झालेल्या ‘टेक लॉ अँड पॉलिसी’ या विषयातील विद्यार्थ्यांना स्वतंत्र संशोधन प्रकल्प राबवण्याची संधी मिळणार आहे. यासाठी फेसबूक आपल्या भागिदारांची मदत घेणार आहे. भारतात तंत्रज्ञान प्रचंड वेगाने विकसित होत आहे, त्यामुळे त्यासंबंधी कायदे आणि धोरणं तयार करण्याची गरज निर्माण होत आहे. भविष्यातील अशा टेक लॉ आणि पॉलिसीसंदर्भातल्या विषयांवर चर्चा करण्याच्या दृष्टीने स्वतंत्रपणे अभ्यास करण्यास विद्यार्थांना या उपक्रमामुळे मदत होईल, असंही फेसबुकच्या पत्रकात म्हटलं आहे. हे ही वाचा: जिल्हाधिकाऱ्यांची फेसबुक रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर आला 'हा' मेसेज; मित्रपरिवार हैराण, अखेर मोठा उलगडा 'एफआयटीएस'च्या 2021-2022मध्ये सुरू होणाऱ्या या पहिल्या बॅचमध्ये  सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी (Centre for Internet and Society), द ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन (Observer Research Foundation), द कार्नेज एंडोवमेंट फॉर इंटरनॅशनल पीस इंडिया (the Carnegie Endowment for International Peace India) आणि द सॉफ्टवेअर फ्रीडम लॉ सेंटर (Software Freedom Law Centre) या संस्था मार्गदर्शक म्हणून सहभागी होतील. पहिल्या बॅचमध्ये नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी, बेंगलुरू, डब्ल्यूबी नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ ज्युरिडीकल सायन्सेस, कोलकाता, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, दिल्ली आणि नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, जोधपूरमध्ये लॉच्या चौथ्या आणि पाचव्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. एफआयटीएसचा हा प्रशिक्षण कार्यक्रम नऊ महिन्यांचा असेल आणि तो यावर्षीच्या उन्हाळ्यात सुरू होईल असं फेसबुकनी स्पष्ट केलं आहे.
Published by:Prem Indorkar
First published: