UGC कडून सरकारी शिष्यवृत्तींच्या अर्जासाठी मुदतवाढ; ही आहे अर्जाची शेवटची तारीख

UGC कडून सरकारी शिष्यवृत्तींच्या अर्जासाठी मुदतवाढ; ही आहे अर्जाची शेवटची तारीख

आता युजीसीने जाहीर केलेल्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तींचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 5 जानेवारी : यूजीसीने (University Grand Commission) सरकारी शिष्यवृत्तींकरिता (Government Scholership) अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ केली आहे. त्यामुळे या शिष्यवृत्ती घेऊ इच्छिणाऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. विविध कारणांमुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज दाखल करु शकले नव्हते. मात्र आता युजीसीने जाहीर केलेल्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तींचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ज्यांनी अद्याप या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेला नाही, त्या व्यक्ती आता 20 जानेवारीपर्यंत शासकीय शिष्यवृत्तीसाठी अर्ज दाखल करु शकणार आहेत. अर्जांची छाननी 5 फेब्रुवारीला करण्यात येणार असल्याचे यूजीसीने म्हटले आहे. युजीसीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, विद्यार्थ्यांनी तातडीने सरकारी शिष्यवृत्तीसाठी अर्ज दाखल करावा, जेणेकरुन संस्थांना त्याची छाननी करताना कोणत्याही समस्या भेडसावणार नाहीत. यापूर्वी या शिष्यवृत्यांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2020 होती. परंतू, आता मुदतीत वाढ करुन ती 20 जानेवारीपर्यंत करण्यात आली आहे. तसेच 31 जानेवारीपर्यंत शिष्यवृत्ती अर्जांची पडताळणी पूर्ण करावी, अशा सूचना युजीसीने विद्यापीठांना दिल्या आहेत.

हे ही वाचा-ब्रिटनच्या पंतप्रधानांचा भारत दौरा रद्द; प्रजासत्ताक दिनी राहणार होते उपस्थित

या शिष्यवृत्तींमध्ये विद्यार्थिनींसाठी इंदिरा गांधी पीजी स्कॉलरशिप, विद्यापीठस्तरावर विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पीजी स्कॉलरशिप, नॉर्थ-इस्ट भागातील विद्यार्थ्यांसाठी ईशान-उदय स्कॉलरशिप, व्यावसायिक अभ्यासक्रमातील एससी-एसटी विद्यार्थ्यांसाठी पीजी स्कॉलरशिपचा समावेश आहे. युजीसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जे विद्यार्थी 2020-2021 या वर्षासाठी अद्यापपर्यंत अर्ज दाखल करु शकले नाहीत किंवा जे यापूर्वी भरलेला अर्ज रिन्यू (Renew) करु शकले नाहीत, असे विद्यार्थी 20 जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करु शकतात. अर्ज दाखल करण्यासाठी इच्छूक विद्यार्थ्यांनी यूजीसीच्या अधिकृत वेबसाइटला (Website) भेट द्यावी. तेथे दिलेल्या माहितीनुसार अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. अभ्यासात हुशार असणाऱ्या पण आर्थिक परिस्थिती नसलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचं शिक्षण केवळ आर्थिक कारणामुळे अडू नये म्हणून मुख्यत्वेकरून शिष्यवृत्ती दिली जाते. देशातील अनेक थोर मंडळी शिष्यवृत्ती मिळवून शिकली आहेत. यात विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत संबंधित संस्था करते. परंतु त्या आधी विद्यार्थ्याला परीक्षा देऊन त्याची गुवणत्ता सिद्ध करावी लागते.

Published by: Meenal Gangurde
First published: January 5, 2021, 6:49 PM IST
Tags: ugc

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading