Home /News /career /

EXIM Bank Recruitment: भारतीय निर्यात-आयात बँक मुंबई इथे 'या' पदांसाठी नोकरीची संधी; लगेचच करा अप्लाय

EXIM Bank Recruitment: भारतीय निर्यात-आयात बँक मुंबई इथे 'या' पदांसाठी नोकरीची संधी; लगेचच करा अप्लाय

यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2021असणार आहे.

  मुंबई, 23 सप्टेंबर: भारतीय निर्यात-आयात बँक मुंबई (Export-Import Bank of India Mumbai) इथे लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (EXIM Bank Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. HR सल्लागार या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख  25 सप्टेंबर 2021असणार आहे. या पदांसाठी भरती HR सल्लागार (HR Consultant) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा कमीतकमी  15 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच HR बाबींमध्ये सल्लागार सेवा प्रदान करण्याचा अनुभव, आरक्षणाचं संपूर्ण ज्ञान आणि समज असणं आवश्यक. सार्वजनिक क्षेत्रातील बँका, आरबीआय किंवा मोठ्या खासगी सेक्टर बँकेतू GM / CGM म्हणून निवृत्त असणारे उमेदवार आवश्यक. इतका मिळणार पगार या पदासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांचा पगार हा त्यावेळी ठरवला जाणार आहे. तसंच पगार हा Negotiable असणार आहे. उत्तम कामगिरीनंतर काही रक्कमही दिली जाणार आहे. वयोमर्यादा या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय वयवर्षे 70 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असणं आवश्यक आहे. हे वाचा - Pune Metro Recruitment: पुणे मेट्रो रेल्वेमध्ये तब्बल 96 जागांसाठी मोठी पदभरती ही असणार जबाबदारी बँकेच्या एचआर बाबी / धोरणांवर सल्ला देण्यासाठी, भरती, पदोन्नती, वेतन आणि पगार पुन्हा डिझाइन करणे भरपाई रचना, शिस्तविषयक बाबी इत्यादी जबाबदारी असणार आहे. निवड करण्यात आलेले उमेदवार एक वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार आहे. त्यानंतर काम बघून हाकॉन्ट्रॅक्ट वाढवण्यात येणार आहे. अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी hrm@eximbankindia.in हे वाचा - KDMC Recruitment: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 85,000 रुपये पगाराची नोकरी; 'या' पदांसाठी लगेच करा अप्लाय निवड प्रक्रिया या पदभरतीसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या उमेदवारांची थेट मुलाखत घेण्यात येणार आहे. त्यानंतर उमेदवांची निवड करण्यात येणार आहे. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 25 सप्टेंबर 2021
  JOB ALERT   EXIM Bank Recruitment 2021
  या पदांसाठी भरती  HR सल्लागार (HR Consultant)
  पात्रता आणि अनुभव  सार्वजनिक क्षेत्रातील बँका, आरबीआय किंवा मोठ्या खासगी सेक्टर बँकेतू GM / CGM म्हणून निवृत्त असणारे उमेदवार आवश्यक.
  इतका मिळणार पगार  पगार हा Negotiable असणार आहे.
  अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी  hrm@eximbankindia.in
  निवड प्रक्रिया  शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या उमेदवारांची थेट मुलाखत
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.eximbankindia.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career opportunities, Jobs, Mumbai

  पुढील बातम्या