मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Explainer: ऑक्सफर्ड. केम्ब्रिजसारखी विद्यापीठं खरंच भारतात येणार? या आहेत सरकारच्या गाईडलाईन्स

Explainer: ऑक्सफर्ड. केम्ब्रिजसारखी विद्यापीठं खरंच भारतात येणार? या आहेत सरकारच्या गाईडलाईन्स

 या आहेत सरकारच्या गाईडलाईन्स

या आहेत सरकारच्या गाईडलाईन्स

भारत सरकारकडून यासाठीच्या काही गाईडलाईन्स देण्यात आल्या आहेत. त्यानुसार कोणतीही फॉरेन युनिव्हर्सिटी भारतात कॅम्पस बनवू शकणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 07 जानेवारी: भारतातले विद्यार्थी आता देशाबाहेर न जाता सर्वोत्तम परदेशी विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊ शकतील. कारण, आता परदेशी विद्यापीठांना देशभरात त्यांचे कॅम्पस सुरू करण्याची परवानगी दिली जाणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) 2020 अंतर्गत, उच्च शिक्षणाचं 'आंतरराष्ट्रीयीकरण' हा घटक प्रमुख धोरणात्मक उपक्रमांपैकी एक आहे. यासंबंधीच्या मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा गुरुवारी (5 जानेवारी 2023) प्रसिद्ध करण्यात आला आहे. पण याचा अर्थ कोणतंही इतर देशातील विद्यापीठ भारतात कॅम्पस तयार करू शकणार नाही. भारत सरकारकडून यासाठीच्या काही गाईडलाईन्स देण्यात आल्या आहेत. त्यानुसार कोणतीही फॉरेन युनिव्हर्सिटी भारतात कॅम्पस बनवू शकणार आहे. या गाईडलाईन्स नक्की आहेत तरी काय? जाणून घेऊया.

KVS Recruitment 2023: 13000 जागांपैकी एक सरकारी पद असं शकतं तुमचं; आधी बघा परीक्षेचं संपूर्ण पॅटर्न

गुरुवारी, उच्च शिक्षण नियामक विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) ने परदेशी विद्यापीठांना भारतात प्रवेश करण्यास परवानगी देण्यासाठी मसुदा नियम जारी केला . सार्वजनिक टिप्पण्या आणि अभिप्राय 18 जानेवारीपर्यंत ugcforeigncollaboration@gmail.com वर ईमेलद्वारे पाठवले जाऊ शकतात. नियम या महिन्याच्या अखेरीस सूचित केले जाणार आहेत. पण नेमक्या जगातील काही युनिव्हर्सिटीज भारतात कॅम्पस तयार करण्याबाबत काय विचार करतात? याचा कधी विचार केलाय?

इंडियन एक्सप्रेसच्या एका बातमीनुसार, बर्मिंगहॅम विद्यापीठाच्या प्रवक्त्याने सांगितले की, विद्यापीठाची सध्या भारतात शाखा कॅम्पस उघडण्याची योजना नसली तरी, "आम्ही भागीदारी कार्याच्या संधींसाठी नेहमीच खुले आहोत. तसंच "आमच्याकडे परदेशी कॅम्पसची कोणतीही योजना नाही असं ऑक्सफर्ड विद्यापीठाने संबंधित वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.

BMC Recruitment: महिन्याचा 27,000 रुपये पगार आणि बऱ्याच सुविधा; मुंबई महापालिकेत या पदांसाठी भरती सुरु; करा अप्लाय

एकूणच काय तर भारतात कॅम्पस सुरु करायचं की नाही हा ज्या त्या युनिव्हर्सिटीचा निर्णय असणार आहे. भारतातील विद्यार्थी आणि भारतातील शैक्षणिक परिस्थिती या विद्यापीठांना आवडल्यास ते कॅम्पस सुरु करू शकतील. युरोपीय देशांमधील विद्यापीठांनी भारतातील कॅम्पस स्थापन करण्यात "उत्कृष्ट रस" दर्शविला आहे. पुढील काही महिन्यांत, UGC हा प्रस्ताव पुढे नेण्यासाठी परदेशातील भारतीय मिशनपर्यंत पोहोचेल आणि त्यांना नियमांची माहिती देण्यासाठी विविध देशांच्या राजदूतांशी चर्चा करेल असं UGC नं म्हंटलं आहे.

First published:

Tags: Career, Career opportunities, Education, Job