Home /News /career /

Exam Tips: आता प्रश्नांची मोठी उत्तरं एका वाचण्यात राहतील लक्षात; 'या' टिप्स ठरतील तुमच्यासाठी वरदान

Exam Tips: आता प्रश्नांची मोठी उत्तरं एका वाचण्यात राहतील लक्षात; 'या' टिप्स ठरतील तुमच्यासाठी वरदान

तुम्ही बिनधास्त मोठी उत्तरं लक्षात ठेऊ शकता

तुम्ही बिनधास्त मोठी उत्तरं लक्षात ठेऊ शकता

आज आम्ही तुम्हाला सहा काही टिप्स (Tips to remember long answers) देणार आहोत ज्यामुळे तुम्ही बिनधास्त मोठी उत्तरं लक्षात ठेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया.

    मुंबई, 23 जानेवारी: बोर्डाच्या परीक्षा (Board exams 2022) जवळ येऊ लागल्यामुळे सर्वच विद्यार्थी तयारीला (Board exams Preparation) लागले आहेत. परीक्षा आणि अभ्यास म्हंटलं की विद्यार्थ्यांना अक्षरशः धडकी भरते. अभ्यास नक्की कसा (How to study smartly for exams) आणि कुठून सुरु करायचा या प्रश्नांनी विद्यार्थ्यांना भीती वाटते. वर्षभरात शिकवण्यात आलेलं आपल्याला लक्षात राहील ना आणि परीक्षेत ते नीट लिहू शकू ना याची चिंता विद्यार्थ्यांना असते. त्यात प्रश्नांची मोठी आणि लांबलचक उत्तरं (How to remember long answers) बघितली के विद्यार्थ्यांचा असला नसला तेवढा सर्व आत्मविश्वास (How to be confident in exams) निघून जातो. ही मोठी उत्तरं लक्षातच राहत नाहीत अशी अनेकांची तक्रार असते. पण आता चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला सहा काही टिप्स (Tips to remember long answers) देणार आहोत ज्यामुळे तुम्ही बिनधास्त मोठी उत्तरं लक्षात ठेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया. लांबलचक विषयांना लहान मुद्द्यांमध्ये विभाजित करा   मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका पाहून परीक्षेच्या पद्धतीची कल्पना येणे सोपे होते. लांबलचक उत्तरांचे प्रश्न तयार करणे फार महत्वाचे आहे. हे प्रश्न अनेक परीक्षांमध्ये विचारले जाण्याची शक्यता असते. त्यांना तयार करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मोठ्या उत्तरांची लहान मुद्यांमध्ये विभागणी करणे आणि नंतर प्रत्येक मुद्दा लिहून ते लक्षात ठेवणे. अशा प्रकारे बोर्डाच्या परीक्षेतही लांबलचक उत्तरे सहज लिहिता येतात. Bank Exam Tips: आता एका Attempt मध्ये क्रॅक होईल बँक PO परीक्षा; वाचा टिप्स लहान उत्तर पहिले लक्षात ठेवा कोणताही अभ्यास करताना प्रथम 1 किंवा 2 गुणांचे प्रश्न तयार करा. असे केल्याने मूळ संकल्पना नीट कळेल आणि मोठे प्रश्न तयार होण्यासही मदत होईल. हा मार्ग तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम अतिशय जलद कव्हर करण्यात मदत करतो. हे प्रश्न मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये सहज सापडतील. लक्षात ठेवा! Resume मधील 'या' लहान चुकाही पडू शकतात महागात; असा बनवा Resume तयारीसाठी पोपटपंची करू नका तुम्हाला चांगले गुण मिळवायचे असतील तर कोणताही विषय लक्षात ठेवणे टाळा. त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. अनेक वेळा प्रश्न असे बदलतात की विद्यार्थ्यांना ते समजत नाहीत आणि ते घाबरतात. अशा स्थितीत विषयाची उधळपट्टी करण्याऐवजी तो नीट समजून घेऊन पेपरची तयारी करणे गरजेचे आहे. यामुळे तुमचा अभ्यासक्रमही पूर्ण होईल आणि परीक्षेतील विषयाशी संबंधित प्रत्येक प्रश्नाचे उत्तरही तुम्हाला कळेल. त्यामुळे पोपटपंची न करता नीट उत्तर समजून घ्या आणि मग लिहा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Exam, Jobs, Tips

    पुढील बातम्या