मुंबई, 15 मार्च: CBSE बोर्ड इयत्ता 10वी टर्म 1 निकाल (CBSE Term 1 Result 2022) जाहीर झाला आहे. यंदा निकाल सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर अपलोड करण्यात आला नसून तो सर्व शाळांना पाठवण्यात आला आहे. CBSE टर्म 1 च्या परीक्षेत मिळालेले गुण शाळा विद्यार्थ्यांना मिळतील गुणांमध्ये अंतर्गत मूल्यमापन गुण जोडून देतील.
CBSE टर्म 2 परीक्षा (CBSE Term 2 Exam 2022 date) 26 एप्रिल 2022 पासून सुरू होत आहे. CBSE बोर्डाने इयत्ता 10वी आणि 12वीच्या मुख्य परीक्षेची डेटशीट जारी केली आहे. यावर्षी नवीन शैक्षणिक धोरण 2020 लागू झाल्यामुळे परीक्षेच्या स्वरुपात बरेच बदल करण्यात आले आहेत. CBSE टर्म 2 परीक्षा ऑब्जेक्टिव्ह नाही तर सब्जेक्टिव्ह पॅटर्नवर असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्याना आता अभ्यास करण्याची गरज आहे. जर तुम्हालाही CBSE परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर आज आम्ही तुम्हाला याबद्दलच्या काही टिप्स देणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
10वी उत्तीर्णांनो, 'या' जिल्ह्यातील महावितरणमध्ये तब्बल 320 जागांसाठी होणार भरतीया टिप्स करा फॉलो
इतर कोणत्याही विद्यार्थ्याशी स्वतःची तुलना करू नका. दररोज स्वत:साठी काही ध्येये ठेवा आणि ती साध्य करण्यासाठी दुप्पट मेहनत करा.
CBSE बोर्ड परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम NCERT वर आधारित आहे. तुमचा अभ्यासक्रम नीट समजून घ्या आणि त्यानुसार बोर्डाच्या परीक्षेची तयारी करा.
बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीसाठी जवळपास 1 महिना बाकी आहे. त्यामुळे तुमच्या कमकुवतपणावर लक्ष केंद्रित करा. तुमचे हस्ताक्षर बरोबर नसेल किंवा लेखनाचा सराव चुकला असेल तर त्यावर लक्ष केंद्रित करा.
वेळेच्या व्यवस्थापनाचे महत्त्व समजून घ्या आणि अभ्यासासोबतच झोपेची वेळ निश्चित करा.
सकाळी लक्षात ठेवलेल्या गोष्टी मनात बसतात (Best Tips for study). त्याच वेळी, दुपारची वेळ उजळणी टिपांसाठी सर्वोत्तम मानली जाते.
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका पाहून परीक्षेच्या पद्धतीची कल्पना येणे सोपे होते. लांबलचक उत्तरांचे प्रश्न तयार करणे फार महत्वाचे आहे. हे प्रश्न अनेक परीक्षांमध्ये विचारले जाण्याची शक्यता असते. त्यांना तयार करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मोठ्या उत्तरांची लहान मुद्यांमध्ये विभागणी करणे आणि नंतर प्रत्येक मुद्दा लिहून ते लक्षात ठेवणे.
Exam Tips: Group Study दरम्यान अभ्यास होत नाही? टेन्शन नको; या टिप्स येतील कामी
कोणताही अभ्यास करताना प्रथम 1 किंवा 2 गुणांचे प्रश्न तयार करा. असे केल्याने मूळ संकल्पना नीट कळेल आणि मोठे प्रश्न तयार होण्यासही मदत होईल.
Published by:Atharva Mahankal
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.