Home /News /career /

CBSE चा मोठा निर्णय! टर्म 1 ची परीक्षा दिली नसेल तरी नो टेन्शन; बोर्डातर्फे जाहीर होणार निकाल

CBSE चा मोठा निर्णय! टर्म 1 ची परीक्षा दिली नसेल तरी नो टेन्शन; बोर्डातर्फे जाहीर होणार निकाल

विद्यार्थ्यांना CBSE नं दिला मोठा दिलासा

विद्यार्थ्यांना CBSE नं दिला मोठा दिलासा

काही विद्यार्थ्यांनी दोन टर्मपैकी टर्म 1 हे परीक्षा दिली नसल्यामुळे असे विद्यार्थी चिंतेत होते. अशा विद्यार्थ्यांना CBSE नं मोठा दिलासा आहे.

  मुंबई, 25 एप्रिल: कोरोनामुळे मागील वर्षी CBSE बोर्डाच्या परीक्षा (CBSE Board Exams) रद्द करण्यात आल्या होत्या. म्हणूनच या शैक्षणिक वर्षात CBSE ना बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा (CBSE 10th 12th Exams 2022) दोन सत्रांमध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. यापैकी टर्म 1 (CBSE Term 1 Exam) ची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकालही लावण्यात आला होता. आता CBSE बोर्डाच्या परीक्षेचा दुसरा टप्पा म्हणजे CBSE Term 2 Exam परीक्षा ही उद्यापासून सुरु होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी जोमानं अभ्यासाला लागले आहेत. त्यात काही विद्यार्थ्यांनी दोन टर्मपैकी टर्म 1 हे परीक्षा दिली नसल्यामुळे असे विद्यार्थी चिंतेत होते. अशा विद्यार्थ्यांना CBSE नं मोठा दिलासा आहे. जर विद्यार्थ्यांनी टर्म 1 किंवा टर्म 2 पैकी कोणतीही परीक्षा दिली नाही किंवा काही अपरिहार्य कारणास्तव देऊ शकले नाहीत, तरीही अशा विद्यार्थ्यांचा निकाल कॅल्क्युलेट करून जाहीर करण्यात येणार आहे. CBSE बोर्डाच्या परीक्षांच्या निकालाआधी घेण्यात आलेल्या वेबिनारमध्ये CBSE बोर्डाकडून या संबंधीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना टर्म एकची परीक्षा देता आली नाही अशा विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. होम सेंटर्सवर होणार नाही CBSE परीक्षा; बोर्डानं जारी केल्या नव्या गाईडलाईन्स
  अशी घोषणा करताना CBSE नं मात्र काही नियम जाहीर केले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी टर्म एक किंवा टर्म दोन ची परीक्षा दिली नाही अशा विद्यार्थ्यांना परीक्षा न देण्याचं बोर्ड्सला पटवून द्यावं लागेल. जर विद्यार्थ्यांनी काही अपरिहार्य कारणांमुळे परीक्षा दिली नसेल तरच अशा विद्यार्थ्यांचा निकाल इतर पध्दतीने जाहीर करण्यात येईल. तसंच टर्म एकची परीक्षा न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांना टर्म दोनच्या परीक्षेला बसता येईल.
  दोन्ही परीक्षा न दिल्यास.... परीक्षा न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल नक्की कोणत्या पद्धतीनं जाहीर करण्यात येईल आणि कॅल्क्युलेट करता येईल याबाबत CBSE कडून कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. तसंच जे विद्यार्थी दोनही टर्म परीक्षा देणार नाहीत अशा विद्यार्थ्यांना थेट पुढच्या वर्षी परीक्षेला बसता येईल असंही CBSE कडून स्पष्ट करण्यात आलं आहे. पहाटे उठून अभ्यास करायचा आहे पण जाग येत नाही? टेन्शन नको; या टिप्स येतील कामी कोविड पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांना देता येणार परीक्षा जे विद्यार्थी सध्या कोविड पॉझिटिव्ह आहेत अशा विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून अशा विद्यार्थ्यांना स्पेशल परीक्षा गृहात परीक्षा देता येणार आहे. यासाठीची सूचना थेट अशा विद्यार्थ्यांना आणि पालकांना कळवण्यात येणार आहे. तसंच परीक्षेदरम्यान विद्यार्थी किंवा पालक संक्रमित झाल्यास याची माहिती बोर्डाला पुरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Board Exam, Career opportunities, CBSE 10th, CBSE 12th, Education, Exam Fever 2022

  पुढील बातम्या