मुंबई, 30 जून : कर्मचारी राज्य विमा कॉर्पोरेशन (ESIC) मुंबईमध्ये विविध विभागांमधील वरिष्ठ निवासी (Senior Resident) पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदभरती अंतर्गत एकूण 20 पदं भरली जाणार आहेत. उमेदवारांची निवड वॉक-इन-इंटरव्ह्यूद्वारे (Walk in Interview) घेण्यात येईल. 15 जुलै 2021 रोजी मुलाखत घेण्यात येईल.
या जागांसाठी पदभरती
एनेस्थेसियोलॉजी - 01
बायोकेमिस्ट्री - 01
इमर्जन्सी - 05
औषध आणि आयसीयू - 03
मायक्रोबायोलॉजी - 01
नेत्ररोगशास्त्र (डोळा) - 01
औषध (छाती) - 01
रेडिओ डायग्नोसिस (रेडिओलॉजी) -03
शस्त्रक्रिया - 04
हे वाचा - ISRO Recruitment 2021: इंजिनिअर्ससाठी इस्रोमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी
शैक्षणिक पात्रता
ESIC च्या जाहिरातीनुसार, या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांमधून पीजी, एमडी किंवा डीएनबी ची पदवी घेतलेली असावी. तसंच दोन वर्षांचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
इथे होईल मुलाखत
2 रा मजला, एमएस कार्यालय, ईएसआयएस हॉस्पिटल कांदिवली, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व, मुंबई -400101.
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.