जळगाव, 14 जुलै: एरंडोल नगरपालिका जळगाव (Erandol Nagarpalika Jalgaon Recruitment 2021) इथे लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सफाई कर्मचारी (Sweeper) पदासाठी ही भरती असणार आहे. सातवी पास (7th pass job) शिक्षण झालेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे. ऑफलाईन अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2021 असणार आहे.
या पदांसाठी होणार भरती
सफाई कर्मचारी (Sweeper) - एकूण जागा 03
शैक्षणिक पात्रता
या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता सातवी पास असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
हे वाचा - सुवर्णसंधी! बुलढाणा डाक विभागात 'या' पदासाठी जागा रिक्त; आता लगेचच पाठवा अर्ज
अर्ज पाठवण्याचा पत्ता
सदस्य सचिव सरळ सेवा भरती समिती तथा मुख्याधिकारी एरंडोल नगरपालिका, एरंडोल जि. जळगाव
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 27 जुलै 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Jalgaon, Jobs