• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • अशी करा इंग्रजीत सुरुवात, समोरचा तुमच्यावर होईल ‘इम्प्रेस’

अशी करा इंग्रजीत सुरुवात, समोरचा तुमच्यावर होईल ‘इम्प्रेस’

जर तुम्ही कोणाला पहिल्यांदा भेटत असाल आणि इंग्रजीत त्याच्याशी कसं बोलायचं हे तुम्हाला कळत नसेल तर, आता चिंता करू नका.

 • Share this:
  जर तुम्ही कोणाला पहिल्यांदा भेटत असाल आणि इंग्रजीत त्याच्याशी कसं बोलायचं हे तुम्हाला कळत नसेल तर, आता चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला अशी काही सोपी वाक्य सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही सहज इंग्रजीत बोलायला सुरुवात करू शकता. तुमचं हे बोलणं ऐकून समोरचाही तुमच्यावर इम्प्रेस होईल. I’ve heard so much about you (मी तुमच्याबद्दल खूप ऐकलं आहे) – जर तुम्हाला कोणाचं कौतुक करायचं असेल तर तुम्ही हे वाक्य वापरु शकता. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटत असाल आणि त्यांच्याबद्दल दुसऱ्या व्यक्तीकडून आधीच ऐकलं असेल तर तुम्ही हे वाक्य बोलू शकता. Hi,...! How are you? (कसे आहात तुम्ही?)- जर तुम्ही कोणा व्यक्तीला पहिल्यांदा भेटत असाल तर त्यांची विचारपूस करण्यासाठी हे वाक्य वापरु शकता. Have we met before? (आपण याआधी भेटलोय का?)- अनेकदा असं होतं की आपण एखाद्या व्यक्तीला भेटतो पण त्यांना ओळखू शकत नाही. अशावेळी तुम्ही या वाक्याने बोलण्याची सुरुवात करू शकता. It’s good to have you here! (तुम्हाला भेटून चांगलं वाटलं)- एखाद्या पार्टीमध्ये तुम्हाला कोणा व्यक्तीच्या येण्याने आनंद झाला तर ते सांगण्यासाठी तुम्ही या वाक्याचा उपयोग करू शकता. आभार व्यक्त करण्यासाठीही तुम्ही हे वाक्य वापरु शकता. It’s good to see you again! (तुम्हाला पुन्हा भेटून बरं वाटलं)- जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला याआधी भेटला असाल आणि तुम्ही दुसऱ्यांदा परत भेटलात तर तुम्ही हे वाक्य नक्की वापरा. Hi, …! What’s new? (हॅलो, मग नवीन काय चाललंय?)- सर्वसामान्यपणे हे वाक्य मित्रांमध्ये जास्त वापरलं जातं. खूप दिवसांनी तुमचा मित्र तुम्हाला भेटला असेल तेव्हा तुम्ही या वाक्याचा उपयोग करू शकता. VIDEO : ...म्हणून इरफानला त्याचे बाबा, ‘पठाणाच्या घरी ब्राह्मण जन्माला आला म्हणायचे’
  First published: