Home /News /career /

Engineering Life: थ्री इडियट्ससारखं खरंच असतं का इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांचं जगणं? वाचा काही Facts

Engineering Life: थ्री इडियट्ससारखं खरंच असतं का इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांचं जगणं? वाचा काही Facts

कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना इंजिनीरिंगच्या विद्यार्थ्यांचं जग नेमकं असतं तरी कसं? याबद्दलच्या काही खऱ्याखुऱ्या गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत.

    मुंबई, 14 सप्टेंबर: जसा मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे, कमळ हे राष्ट्रीय फुल आहे त्याचप्रकारे Engineering हे आपल्या देशातील राष्ट्रीय शिक्षण (National Education) आहे असं म्हंटलं तर काहीच वावगं ठरणार नाही. दरवर्षी लाखो विद्यार्थी इंजिनिअरिंगला प्रवेश घेतात तर त्यापेक्षा अधिक उत्तीर्ण होऊन बाहेर पडतात. आकडेवारी प्रमाणे भारतात दरवर्षी तब्बल 15 लाख इंजिनिअर्स उत्तीर्ण (Engineers day 2021) होऊन बाहेर पडतात. आता इतक्यांच्या नोकरीबद्दल न बोललेलंच बरं. पण कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना इंजिनीरिंगच्या विद्यार्थ्यांचं जग (Life of Engineers) नेमकं असतं तरी कसं? याबद्दलच्या काही खऱ्याखुऱ्या गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत. इंजिनिअरिंगच्या  विद्यार्थ्यांचं जग, त्यांचं जीवन नेमकं कसं असतं? हे आम्ही काही विद्यार्थ्यांकडूनच जाणून घेतलं. याबाबत आम्हला जो प्रतिसाद मिळाला तो वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही. इंजिनिअरिंगचे काही विद्यार्थी म्हणतात... संपूर्ण इंजिनिअरिंगच्या चार वर्षात फोटोकॉपीवर किंवा झेरॉक्सवर खर्च केलेल्या पैशांची रक्कम ही नवीन झेरॉक्स मशीन खरेदी करता येईल इतकी असते. मात्र इंजिनिअरिंग नोट्स आणि झेरॉक्सशिवाय अपूर्ण आहे. प्रत्येक इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आज कॉलेज जायचं की नाही? हे त्याच्या कॉलेजमधील उपास्थिती म्हणजेच अटेन्डन्सवरून ठरवतो. अटेन्डन्स 75% च्या वर असेल तर बेडवरुन उठण्याचीही तसदी घेत नाही. जोपर्यंत इंजिनिअर्स कोणत्याही घरगुती उपकरणांची दुरुस्ती करत नाहीत मग ते कोणत्याही ब्रांचचे असू देत तोपर्यंत कुटुंबातील सदस्य त्यांना इंजिनिअरची पदवी देत नाहीत. हे वाचा - "Work From Home बंद करा, नाहीतर आमचा संसार मोडेल"; हर्ष गोयंकांना महिलेची विनंती; वाचून येईल हसू परीक्षा आली की 'आज मी नाईट मारणार आहे' हे वाक्य प्रत्येकाच्या तोंडी असतं. तसंच असायमेन्टस आणि शीट्स काढण्यासाठी टोपो मारतो. पास किंवा नापास होण्याची भीती कोणालाच नसते याच कारण म्हणजे हिवाळी परीक्षा नाहीतर उन्हाळी परीक्षा आहेच असा समज. .शिक्षण घेण्यापेक्षा कोणत्या मुलाशी किती मुली बोलतात यावर इंजिनिअर्सची पात्रता ठरते. वरतून सिंगल म्हणवतात पण त्यांचा संपर्क दांडगा असतो.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    पुढील बातम्या