Elon Musk यांच्या कंपनीत काम करण्याचं स्वप्न होईल पूर्ण! लवकरच होणार भरती प्रक्रिया, वाचा सविस्तर

एखाद्या बड्या कंपनीत काम करण्याचं तुमचं स्वप्न असेल तर ती संधी तुम्हाला आता मिळू शकते. तुम्हाला एलन मस्क (Elon Musk) यांच्या कंपनीत काम करण्याची संधी मिळू शकते.

एखाद्या बड्या कंपनीत काम करण्याचं तुमचं स्वप्न असेल तर ती संधी तुम्हाला आता मिळू शकते. तुम्हाला एलन मस्क (Elon Musk) यांच्या कंपनीत काम करण्याची संधी मिळू शकते.

  • Share this:
    नवी दिल्ली, 23 जून: एखाद्या बड्या कंपनीत काम करण्याचं तुमचं स्वप्न असेल तर ती संधी तुम्हाला आता मिळू शकते. तुम्हाला एलन मस्क (Elon Musk) यांच्या कंपनीत काम करण्याची संधी मिळू शकते. इलेक्ट्रिक कार (Electric Car) बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी टेस्ला इंक (Tesla inc.) चे प्रमुख एलन मस्क (Elon musk) यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की महिनाभरात टेस्ला एआय डे  (AI Day) आयोजित करण्यावर विचार सुरू आहे. एआय सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर  संबंधित कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. ट्रेनिंग आणि नोकरी दोन्हीसाठी भरती केली जाणार आहे. मस्क यांनी सोमवारी याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे. भारतात ज्येष्ठ पदांवर होणार नोकरभरती टेस्लाने भारतात देखील कर्मचारी भरती करण्यास सुरुवात केली आहे. सध्या कंपनी केवळ लीडरशीप पोझिशन (Leadership Position) आणि ज्येष्ठ स्तरावरील (Senior Level) पदांसाठी भरती होत आहे. टेस्ला भारतात हेड ऑफ सेल्स (Head of Sales), मार्केटिंग (Marketing) आणि ह्यूमन रिसोर्सेस (Human Resources) सह अनेक पदांवर भरती करत आहे. हे वाचा-मोदी सरकारचं सामान्यांना गिफ्ट! या महिन्यात मिळेल मोफत LPG गॅस सिलेंडर इथे बनणार टेस्लाचा प्लांट टेस्लाने कर्नाटकमध्ये ऑफिस रजिस्टर्ड केलं आहे. प्लांट सुरू करण्यासाठी कंपनीकडे अनेक राज्यांमधून प्रस्ताव आले होते. मात्र अद्याप कंपनीने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. दरम्यान असं मानण्यात येत आहे की टेस्ला कर्नाटकमध्येच कंपनी त्यांचा प्लांट स्थापित करू शकते. कारण कंपनी त्यांच्या मॉडेल 3 कारचे CBU यूनिटसाठी प्रोडक्शन करू इच्छित आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: