मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

मोठी बातमी! दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत शिक्षणमंत्र्यांनी घेतली महत्त्वाची बैठक; पूर्वनियोजनाबद्दल घेतली माहिती

मोठी बातमी! दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत शिक्षणमंत्र्यांनी घेतली महत्त्वाची बैठक; पूर्वनियोजनाबद्दल घेतली माहिती

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभागातील सर्व अधिकार्‍यांची व विविध विषय शिक्षक तज्ञ प्रतिनिधींची बैठक घेतली.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभागातील सर्व अधिकार्‍यांची व विविध विषय शिक्षक तज्ञ प्रतिनिधींची बैठक घेतली.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभागातील सर्व अधिकार्‍यांची व विविध विषय शिक्षक तज्ञ प्रतिनिधींची बैठक घेतली.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 23 ऑक्टोबर: गेल्या दीड वर्षांपासून कोरोनानं (Corona) संपूर्ण देशभरात हाहाकार माजवला होता. यामुळे शाळा, कॉलेजेस बंद होते. तसंच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द (10th and 12th exams 2022) करण्यात आल्या होत्या. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होऊ लागला आहे. त्यामुळे शाळा आणि कॉलेजेस सुरू करण्यात आले आहेत. म्हणूनच यंदा बोर्डाच्या परीक्षा कोणत्या पद्धतीनं (Exam pattern of 10th 12th exam 2022) आणि कशा घेण्यात याव्या याबद्दल शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभागातील सर्व अधिकार्‍यांची व विविध विषय शिक्षक तज्ञ प्रतिनिधींची बैठक घेतली.

यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. मात्र अंतर्गत मूल्यांकन पद्धतीनं विद्यार्थ्यांना गन देण्यात आले. निकाल लावण्याच्या या पद्धतीमध्ये अनेक त्रुटी होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. मात्र आता या सर्व परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती.

MPSC आयोगाचा पारदर्शक पाऊल, विद्यार्थ्यांना मिळणार उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज!

परीक्षा कधी आणि कशा पद्धतीनं घेण्यात याव्यात? विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे किंवा नाही हे कसं ठरवावं? विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी तयारी आहे का? तसंच पुन्हा कोरोनाची लाट आली तर शाळा आणि परीक्षांचं कसं होणार? याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये शासनातर्फे शिक्षण मंत्र्यासोबत शिक्षण सचिव वंदना कृष्णा,आयुक्त विशाल सोळंकी, संचालक दत्तात्रय जगताप, संचालक दिनकर टेमकर , महाराष्ट्र राज्य मंडळाचे सचिव डॉ अशोक भोसले उपस्थित होते.

परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच व्हाव्या

मागील शैक्षणिक वर्षात दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आणि अंतर्गत मूल्यांकन पद्धतीनं निकाल लावण्यात आले. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात राहिला नाही तर यंदा विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात याव्यात असं मत अनेकांनी या बैठकीत व्यक्त केलं आहे.

First published:

Tags: Board Exam, Career