10 वी उत्तीर्ण झालेल्यांसाठी DRDO मध्ये नोकरी, जाणून घ्या कसा करायचा अर्ज

10 वी उत्तीर्ण झालेल्यांसाठी DRDO मध्ये नोकरी, जाणून घ्या कसा करायचा अर्ज

भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO)च्या सेंटर फॉर पर्सनल टॅलेंट मॅनेजमेंटने मल्टि टास्किंग स्टाफच्या 1817 पदांसाठी जाहीरात काढली आहे.

  • Share this:

मुंबई, 13 डिसेंबर : भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO)च्या सेंटर फॉर पर्सनल टॅलेंट मॅनेजमेंटने मल्टि टास्किंग स्टाफच्या 1817 पदांसाठी जाहीरात काढली आहे. यासाठी 23 डिसेंबर 2019 पासून अर्ज करता येणार आहेत. तर 23 जानेवारी 2020 ही अर्ज करण्याची अखेरची तारीख आहे. परीक्षेची तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे.

अर्ज कऱणाऱ्या उमेदवारांमध्ये महिला/एससी/एसटी/पीडब्ल्यूबी/ईएसएम या वर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. तर खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये शुल्क आकारले जाईल. क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/नेट बँकिंगच्या माध्यमातून शुल्क भरता येईल.

उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे ते कमाल वय 25 वर्षे इतकं असणं बंधनकारक आहे. त्याशिवाय नियमानुसार वयात सूट दिली जाईल. उमेदवाराचं शिक्षण दहावी किंवा आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

1817 पदापैकी एससीसाठी 163, एसटी 114, ओबीसी 503, ईडब्ल्यूएस 188 आणि खुल्या वर्गासाठी 849 जागा आहेत. डीआरडीओच्या लिंकवरून अर्ज करता येईल. अधिक माहितीसाठी https://www.drdo.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

Published by: Suraj Yadav
First published: December 13, 2019, 11:05 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading