Home /News /career /

अभिमानास्पद! जि.प.ची शाळा ते देशातील कोरोना लशीसंदर्भातल्या तज्ज्ञ समितीचे प्रमुख, महाराष्ट्राच्या पोराचा थक्क करणारा प्रवास

अभिमानास्पद! जि.प.ची शाळा ते देशातील कोरोना लशीसंदर्भातल्या तज्ज्ञ समितीचे प्रमुख, महाराष्ट्राच्या पोराचा थक्क करणारा प्रवास

परभणीचे (Parbhani) भूमिपुत्र डॉ. वेणुगोपाल सोमाणी (Dr venugopal Somani) हे Drugs Controller General of India (DCGI)चे संचालक असून त्यांनी देशातील कोरोनावरील दोन लशींना (Corona Vaccine) परवानगी दिली आहे.

    परभणी, 04 जानेवारी : आपल्या देशात इंग्लिश मीडियमला नको तेवढं महत्त्व दिलं गेलं आहे. आपला पोरगा जर मराठी माध्यमातून शिकला, तर त्याचं पूर्ण शिक्षणचं वाया गेलं, असं मानण्याची रुढप्रथा आपल्या भारतीय जनमाणसात रुजली आहे. पण या धारणेला छेद देत परभणीच्या एक सुपुत्रानं जिल्हा परिषदेची शाळा ते ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या संचालक पदापर्यंत मजल मारली आहे. त्यामुळं जिद्द आणि चिकाटी असेल तर आपल्याला कोणतीही गोष्ट रोखू शकत नाही. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. परभणीचे भुमिपुत्र डॉ. वेणुगोपाल सोमाणी हे ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डीसीजीआयचे संचालक असून त्यांनी देशातील कोरोनावरील दोन लशींना परवानगी दिली आहे. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही अभिमानास्पद बाब आहे. परभणीतील बोरी या छोट्याशा गावात झाला जन्म डॉ. वेणुगोपाल सोमाणी यांचा जन्म परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी या छोट्याशा गावात झाला. त्यांनी त्यांच सुरुवातीचं शालेय शिक्षण बोरी येथील जिल्हा परिषद शाळेतून पूर्ण केलं. दहावीपर्यंतचं शिक्षण बोरी येथील जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी नांदेड गाठलं. तर नागपूर येथील गव्हर्नमेंट कॉलेजमधून फार्मसीची पदवी घेतली त्यानंतर त्यांनी नागपूर विद्यापीठातून पीएचडी पुर्ण केलं. ते एवढ्यावरचं थांबले नाहीत तर त्यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी थेट दिल्ली गाठली. त्यानंतर युपीएससी परिक्षा उत्तीर्ण करून त्यांनी डिसीजीआयच्या संचालकपदी मजल मारली. आणि काल त्यांनी दिल्ली इथे पत्रकार परिषद घेऊन कोविशिल्ड आणि कोवॅक्सीनला परवानगी दिली आहे. ही गोष्ट महाराष्ट्रासाठी अभिमानाची आहे. जिल्हा परिषदेचा विद्यार्थी ते डिसीजीआयच्या संचालकपद त्यांचा प्रवास खरंच प्रेरणा देणारा आहे. घरची परिस्थिती जरी सधन असली तरी डॉ. वेणुगोपाल सुरुवातीपासून आभ्यासात हुशार होते.  अगदी लहानपणापासूनचं त्यांचा कल औषध निर्मितीकडे होता. म्हणूनच त्यांनी त्याचं पदवीचं शिक्षण फार्मशीमध्ये पूर्ण केलं. या पदापर्यंत पोहचण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले आहेत. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करत त्यांनी हे यश संपादन केलं आहे. मुलाच्या यशानं अभिमानानं मान उंच झाली असल्याची प्रतिक्रिया डॉ. वेणुगोपाल यांच्या आईवडिलांनी दिली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona vaccine

    पुढील बातम्या