मराठी बातम्या /बातम्या /करिअर /तु काय कलेक्टर आहेस का? महिलेने दिला टोमणा अन् तरुणी झाली IAS

तु काय कलेक्टर आहेस का? महिलेने दिला टोमणा अन् तरुणी झाली IAS

लखनौच्या किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस करत असताना 2006 मध्ये त्यांनी आयएएस अधिकारी होण्याचा निर्णय घेतला.

लखनौच्या किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस करत असताना 2006 मध्ये त्यांनी आयएएस अधिकारी होण्याचा निर्णय घेतला.

लखनौच्या किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस करत असताना 2006 मध्ये त्यांनी आयएएस अधिकारी होण्याचा निर्णय घेतला.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • New Delhi, India

  नवी दिल्ली, 10 जानेवारी : बर्‍याचदा लोक टोमणे मारतात आणि म्हणतात की, तू काय कलेक्टर आहेस? मात्र, असे असताना काही जण हे या लोकांचे टोमणे मनावर घेतात आणि ते कलेक्टर होणंच, आपल्या जीवनाचं ध्येय बनवतात. अशा अधिकाऱ्यांमध्ये आयएएस अधिकारी प्रियंका शुक्ला यांचाही समावेश आहे. आज आपण त्यांच्या यशस्वी प्रवासाबाबत जाणून घेणार आहोत.

  लखनौच्या किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस करत असताना 2006 मध्ये त्यांनी आयएएस अधिकारी होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या वडिलांना नेहमी त्या कलेक्टर व्हाव्यात असे वाटत होते. मात्र, प्रियंका यांनी डॉक्टर होण्याचा हट्ट धरला. एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर त्यांनी लखनऊमध्ये तयारी सुरू केली. यादरम्यान त्या आजूबाजूच्या झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन लोकांना त्यांच्या आरोग्याबाबत जागरूक करत असत.

  एका महिलेने टोमणे मारले अन् घेतला मोठा निर्णय

  एके दिवशी त्या त्यांची प्रॅक्टिस सोडून झोपडपट्टीत गेल्या होत्या. येथे त्यांनी एका महिलेला घाणेरडे पाणी पिताना आणि तेच पाणी आपल्या मुलाला देताना पाहिले. हे दृश्य पाहिल्यावर प्रियंका यांनी महिलेला ते पाणी पिऊ नका आणि मुलाला पाजू नका असा सल्ला दिला. महिलेने त्यांच्या सल्ल्याकडे लक्ष दिले नाही. तर वरून टोमणा मारताना ती महिला म्हणाली की, तु कुठली कलेक्टर आहेस का, तुझं ऐकायला हवं तर. प्रियंका शुक्ला यांनी ही गोष्ट मनावर घेतली. त्यांनी त्याचवेळी ठरवले की, त्यांना हवा असलेला बदल करण्यासाठी त्यांना कलेक्टर व्हायचे आहे.

  दुसऱ्या प्रयत्नात आयएएस -

  प्रियंका शुक्ला यांनी आयएएस होण्याच्या दिशेने पाऊल टाकले. पहिल्यांदा त्यांना अपयश आले. मात्र, दुसऱ्या प्रयत्नात त्या UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करण्यात यशस्वी झाल्या. 2009 मध्ये त्या IAS अधिकारी झाल्या. त्यांना छत्तीसगड केडर मिळाले. सध्या त्या छत्तीसगड सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या विशेष सचिव आहेत. त्यासोबत नगर प्रशासन आणि विकास संचालकपदाची अतिरिक्त जबाबदारीही त्या सांभाळत आहेत. याआधी त्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या सहसचिव होत्या.

  हेही वाचा - ऑफिसला ये-जा करताना यूट्युबवरुन केला अभ्यास, अन् थेट बनला IAS अधिकारी!

  माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते दोनदा सन्मानित -

  आयएएस अधिकारी प्रियंका शुक्ला आपल्या कामामुळे अनेकदा चर्चेत असतात. प्रशासकीय अधिकारी असण्याबरोबरच त्या कंटेम्परेरी डांसरही आहेत. त्या कविताही लिहितात. त्यांना गाण्याची आणि चित्रकलेचीही आवड आहे. याची माहिती त्यांनी स्वतः त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर दिली आहे. IAS प्रियंका शुक्ला यांना तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते दोनदा सन्मानित करण्यात आले आहे. 2011 च्या जनगणनेत केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांना राष्ट्रपती पदकही मिळाले आहे.

  First published:

  Tags: Ias officer, Inspiring story, Success story, Upsc, Upsc exam