मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Job Cover Letter मधील 'त्या' 3 चुका शुभमला पडल्या महागात; तुम्हीही त्याच मिस्टेक्स करत नाही ना?

Job Cover Letter मधील 'त्या' 3 चुका शुभमला पडल्या महागात; तुम्हीही त्याच मिस्टेक्स करत नाही ना?

 'त्या' 3 चुका शुभमला पडल्या महागात;

'त्या' 3 चुका शुभमला पडल्या महागात;

Cover Letter बनवताना नक्की कोणत्या चुका करू नयेत हे शुभमच्या अनुभवांतून कळणार आहे. शुभमने केलेल्या चुका तुम्ही करू नये म्हणून त्याने केलेल्या चुका जाणून घेऊया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 19 सप्टेंबर: कोणत्याही कंपनीत जॉब मिळवण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमचा रेझ्युमे (Resume tips) म्हणजेच बायोडेटा तिथल्या वरिष्ठांना द्यावा लागतो. तुमच्या बायोडेटामधील माहितीनुसार तुमच्याबद्दल प्रत्येक माहिती समोरच्यांना समजते. मात्र अनेकदा कंपनीत तुमचा एकच बायोडेटा नसतो. वरिष्ठांना हजारो बायोडेटा मिळत असतात. त्यामुळे तुमचा बायोडेटा पूर्णपणे वाचला जाईलच असं नाही. त्यामुळे अनेकांना जॉब मिळू शकत नाही. मात्र तुम्हाला जॉब हवा असेल तर बायोडेटासह Cover Letter देणंही महत्त्वाचं आहे. अगदी फ्रेशर्सपासून ते प्रोफेशनल्सपर्यंत सर्वांना Cover लेटर आवश्यक आहे.

काही वर्षांपूर्वी शुभमने Resume सोबत कव्हर लेटर दिलं नाही आणि त्याला जॉब गमवावा लागला. त्यानंतर त्याने कव्हर लेटर दिलं मात्र काही चुकांमुळे त्याला पुन्हा जॉब गमवावा लागला होता. म्हणूनच आज शुभमने स्वतः धडा घेऊन तुमच्यासाठी काही टिप्स आणल्या आहेत. तुम्हाला Cover Letter बनवताना नक्की कोणत्या चुका करू नयेत हे शुभमच्या अनुभवांतून कळणार आहे. शुभमने केलेल्या चुका तुम्ही करू नये म्हणून त्याने केलेल्या चुका जाणून घेऊया.

Interview ला निघालात? आधी ही गोष्ट वाचूनच जा, 'त्या' एक्स्ट्रा शर्टमुळे बदलेल भविष्य

कंपनीबद्दल माहिती न घेणे

पोझिशन आणि कंपनीच्या गरजेनुसार कव्हर लेटर लिहिण्यासाठी संशोधन आवश्यक आहे. कंपनीचे संशोधन (how to research for company) केल्याने तुम्हाला त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाच्या गोष्टी ओळखण्यात मदत होते आणि कोणती माहिती समाविष्ट करायची हे निर्धारित करण्यात मदत होते. आपण शुभमने ही सर्वात गरजेची गोष्ट केली नाही. त्यामुळे त्याच्या कव्हर लेटरमध्ये कंपनीच्या गरजेनुसार काहीही माहिती नव्हती. कव्हर लेटर लिहिण्यासाठी उत्तम संशोधन हा सहसा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. मात्र अनेकदा माहिती न घेता कव्हर लेटर बनवल्यामुळे नोकरी हातची नोकरी गेली. म्हणूनच कंपनीची आणि पोस्टची संपूर्ण माहिती घेऊनच कव्हर लेटर बनवणं आवश्यक आहे.

तुमच्यातील क्षमता न लिहिणे

तुमचे कव्हर लेटर तुमची सर्वात मोठी ताकद असलेली कौशल्ये हायलाइट (How to highlight Skills in Cover letter) करत आहे का हे बघणे आवश्यक आहे. मात्र शुभमने हेही केलं नाही. त्याने स्वतःचे स्किल्स आणि स्वतःची क्षमता कव्हर लेटरमध्ये दाखवूनच दिली नाही. त्यामुळे त्याला नोकरी मिळू शकली नाही. पण ज्या पदासाठी अर्ज करत आहात त्याच्याशी निगडित स्किल्स लिहिण्याचा सल्ला शुभमने दिला.

कव्हर लेटरमध्ये पगाराबद्दल माहिती नको

शुभमने केलेली सर्वात मोठी चूक म्हणजे त्याने त्याचा आधीच्या कंपनीतील पगार दुसऱ्या कंपनीला देण्याच्या कव्हर लेटरमध्ये लिहिला. यामुळे त्याचं इम्प्रेशन कमी झालं आणि त्याला जॉब मिळू शकला नाही. पगाराच्या अपेक्षांबद्दल खूप लवकर बोलल्याने असे दिसते की तुम्हाला कंपनीला कसा फायदा होऊ शकतो यापेक्षा नोकरीतून मिळणाऱ्या फायद्यांमध्ये तुम्हाला अधिक रस आहे. म्हणून कव्हर लेटरमध्ये पगाराबद्दल लिहू नका असा सल्ला त्यानं दिलाय.

First published:

Tags: Career opportunities, Job, Jobs Exams